सुधाकरनगर (पेढी) येथे मनोरुग्ण नातवाने दहा रुपयासाठी केला आजारी आजीचा खून

🔸आठवडाभरा पूर्वी माळकिन्ही येथेही सख्या मनोरुग्ण भावाने आपल्या भावाचा खून केला. या घटनेची शाई वाळते न वाळते तेच पुन्हा आता ही घटना

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि .3 सप्टेंबर) :- तालुक्यात मनोरुग्ण आरोपीच्या संख्येत वाढ झाली आहे. परिसरात खुनाच्या गंभीर घटना घडत असल्याची समोर आले आहे. सुधाकरनगर (पेढी) येथील एका मनोरुग्ण नातवाने आपल्या 85 वर्षीय आजीचा दहा रुपये मागणीसाठी लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून केल्याची हृदय दायक घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

  महागाव तालुक्यातील सुधाकरनगर तांडा (पेढी) येथील मनोरुग्ण आरोपी श्याम उत्तम जाधव वय 26 वर्षे याने आपली आजी कोंडाबाई बालचंद्र जाधव वय 85 वर्षे या आपल्या म्हाताऱ्या आजीला 3 सप्टेंबर रोज बुधवारी 11.45 च्या दरम्यान लाकडी दांडक्याने मारून खून केल्याची घटना उघड झाली.

कोंडाबाई जाधव ह्या मागील बऱ्याच वर्षापासून तब्येतीमुळे अंथरुणात आजारी अवस्थेत पडून होत्या. बुधवारी दुपारी पावणे अकरा वाजताच्या दरम्यान श्याम जाधव ह्या नातवाने आपल्या आजीकडे खर्चासाठी दहा रुपयाची मागणी केली. तो तिला नेहमी आपणाला खर्चा करिता पैशाची मागणी करीत होता. बुधवारी आरोपी शामने आपल्या आजीला पैशाकरिता तगादा लावल्याने आजीने त्रासून जाऊन ‘मन मारणाक,मारकन पिसा छेई छा’ असे हट्टी नातवास म्हातारी कंटाळून सहज बोलून गेली.

मनोरुग्ण असलेल्या आरोपी शाम जाधव यांने क्षणाचाही विलंब न करता अंथरुणावर आजारी अवस्थेत खिळलेल्या आपल्या आजीच्या छातीवर, तोंडावर लाकडी दांडक्याने जबर प्रहार करून खून केला आहे. असाच प्रकार मागील आठवड्यात 26 ऑगस्ट रोजी माळकिन्ही येथील प्रदीप रिंगे हा आपल्या शेतात काम करीत असतांना त्याचा मोठा भाऊ निलेश रिंगे यांच्याशी शेतातील मुगाच्या शेंगा तोडण्याच्या किरकोळ वादातून प्रदीपने मानसिक तणावातून बांबूच्या काठीने आपल्या सख्ख्या भावाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जबरदस्त तडाखे देऊन खून केल्याची वेदना दायक घटना घडली. आठवडाभरापूर्वी घडलेल्या घटनेची शाई वाळते न वाळते तेच पुन्हा आता सुधाकरनगर तांडा येथील मनोरुग्ण नातवाने आपल्या आजारी आजीचा लाकडी दांडक्याने छातीमध्ये जबर मार देऊन खून केला. मृतक कोंडाबाई भालचंद्र जाधव हिचे शेव उत्तरीय तपासणी करिता सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महागाव तालुक्यातील अशा मनोरुग्ण खुणी आरोपींची तालुक्यांत दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. गावातील पोलीस पाटलांनी अशा मनोरुग्णा बाबत प्रशासनाला माहिती देणे गरजेचे आहे. महागाव तालुक्यांत मनोरुग्णांची संख्या किती आहे? या बद्दल प्रशासनाला माहिती होणे गरजेचे आहे. अशा मनोरुग्णा पासून नाहक जीवांचे बळी जात आहेत, ही चिंतनीय बाब म्हणावी लागेल.