संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून महागावात रास्ता रोकोचे आयोजन

🔸एक दिवसीय रास्ता रोकोची मराठा समाजात तर्फे आयोजन

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.1 सप्टेंबर) :- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घ्यावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू ठेवून आहेत. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा जनसमर्थन मिळत असून राजधानी भगवीमय झाली आहे.

या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने उपोषणाला पाठिंबा दर्शविला असून उद्या मंगळवार, दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी महागाव शहरातील नागपूर–तुळजापूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनासाठी मराठा बांधव शैलेश दिलीपराव कोपरकर, उदय नरवाडे, संजय नरवाडे, तेजस नरवाडे, शाखा भरवाडे, नितीन विजय नरवाडे, अमर नरवाडे, शिवाजी नरवाडे, अविनाश ठाकरे, सचिन संजय नरवाडे, विशाल पवार, निलेश भगवानराव नरवाडे, संजय कोपरकर, प्रतीक पाटील नरवाडे आदींसह अनेकांनी महागाव पोलीस स्टेशनला निवेदन दिले.

सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोकोसाठी मोठ्या संख्येने बांधव उपस्थित राहावे असेअसे आवाहन करण्यात आले आहे.