सिद्धिविनायक प्रतिष्ठान व अमोल भाऊ चिकणे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

🔸सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल भाऊ चिकणे यांच्या पुढाकारातून टेंभी येथे रक्तदान शिबिर

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव (दि.1 सप्टेंबर) :- तालुक्यातील टेंभी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रावातील सिद्धिविनायक प्रतिष्ठान मंडळ व अमोलभाऊ चिकणे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. दरवर्षीच्या परंपरेला सातत्यपूर्ण श्री गणेश उत्सवाच्या काळी( टेंभी) येथील उत्साही नवयुवक मंडळांनी यावर्षी रक्तदान शिबिर यशस्वी केले.

आपणाला समाजाप्रती काही देणे असते, या उदात्त भावनेने टेंभी‌ (काळी) येथील अमोल चिकणे मित्र मंडळ आणि गणेश मंडळ यांच्या प्रयत्न करून रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या वेळी सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे गणेशभक्त अनुयायी अमोल भाऊ चिकणे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान करून ही परंपरा जोपासली आहे.

रक्तदानाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांच्या सेवेकरिता सिद्धी विनायक प्रतिष्ठान नेहमी प्रयत्नशील असते. त्या नुसार यावेळी सुद्धा सदर उपक्रम 31 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर उपक्रम घेऊन यशस्वी केला आहे. या वेळी मंडळाचे सदस्य अविनाश शिरसागर, आनंद कवाणे, शैलेश मैद, वैभव कवाने, सरपंच अमोलभाऊ चिकणे, सुरेश कवाणे, लखन कांबळे, शुभम गंगात्रे, बाळू सोळंके, वैभव शेवाळकर, जानीकराव शेवाळकर, सोनाजी कवाने, सोनाजी चेपटे यांचेसह अनेक भक्त मंडळींनी यावेळी उत्कृष्ट सहकार्य केले.

विशेष सहकार्य गुरु गोविंद सिंघजी ब्लड सेंटर नांदेड यांच्या टीम द्वारे या वेळी एकूण 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले आहे.