श्री रेणुका माता मंदिर दर्शन ग्रहात रोख रकमेसह सोन्याची

🔸सोन्यासह रकमेची चोरी करणारी महिला सीसीटीव्हीत कैद 

🔹पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

✒️शेख रफिक गाईड माहुर(Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.19 मे) :-

माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात दर्शन घेण्याच्या मुख्य गर्भगृहात दर्शनगृहात मुंबईची भाविक महिला दर्शन घेत असताना अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधून धक्का मारून पुढे जाण्याच्या गडबडीत पर्समधून रोख रकमेसह दोन सोन्याया अंगठ्या एकूण 1 लाख 59 हजार 600 रु ची चोरी केल्याची घटना दि 18 रोजी सकाळी 8 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे .

माहूर गडावर गेल्या दोन दिवसापासून प्रचंड गर्दी असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे श्री रेणुका माता मंदिरावर पोलीस सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे असताना नातेवाईकसह दर्शनासाठीआलेली महिला उषा सुधाकर तायडे वय 59 राहणार डोंबिवली मुंबई ह्या रांगेत उभे राहून दर्शन करण्याच्या मुख्य गर्भगृहात पोहोचल्या दर्शन घेत असताना मागून दोन महिलांनी दर्शनासाठी धक्काबुक्की करत पुढे गेल्या त्याच गडबडीत महिलेच्या गळ्यात अडकविलेल्या पर्समध्ये रोख रक्कम 59 हजार 600 रुपये तसेच दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण एक लाख 59 हजार 600 रुपयांचा एवज त्यांनी चोरी केला सदर महिलेने देवस्थान वरील सीसीटीव्हीचे फुटेज घेऊन माहूर पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी तात्काळ घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.