काळी ( दौ.) वनपरिक्षेत्रात रोह्याची कत्तल

🔸पोखरी घाटाच्या नजीक शिकाऱ्याने केली रोह्याची निर्गुण हत्या

🔹काळी (दौ.) वनपरिक्षेत्र विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.10 मार्च) :-

यवतमाळ जिल्ह्यात महांगाव तालुक्यांतील काळी( दौ.) वनपरिक्षेत्राता अंतर्गत येणाऱ्या पोखरी घाट परिसरात पुन्हा एकदा नीलगाईची (रोही) निर्घुण शिकार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिकाऱ्यांनी यांनी सापळा लावून निलगाय (रोही) पकडली आणि धारदार शस्त्राने तिची हत्या करून अवयव कापून नेल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून काळी(दौ.) वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

   10 मार्च रोजी स्थानिक नागरिकांना पोखरी शिवारातील घाट परिसरात नीलगाईचा मृतदेह अस्तव्यस्त अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता हा प्रकार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा नसून काही व्यक्तींनी केलेल्या शिकारीचा कट असल्याचे स्पष्ट होत आहे. शिकाऱ्यांनी निलगाईचे पाय, पोटातील अवयव आणि मोठ्या प्रमाणात मांस कापून नेल्याचे दिसून आले.

या गंभीर घटने बाबत काळी (दौ.) वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनी वरून विचारणा केली असता त्यांनी सदर घटनेतील प्राण्याच्या बॉडीचे शवविच्छेदन करण्यात येत असून याबाबत पुढील माहिती देणार असल्याचे सांगितले. घडलेल्या प्रकारामुळे वन विभागाची गस्त व्यवस्था आणि देखरेख यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे याच परीक्षत्रात 16 एप्रिल 2024 रोजी 3 नीलगाईची शिकार झाल्याचा खळबळ उडवून देणारा प्रकार घडला होता. त्या वेळीही वनविभागाची यंत्रणा निष्क्रिय ठरल्याने,अखेर स्थानिक गुन्हे शाखेला हस्तक्षेप करावा लागला. त्या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली होती. तर 2 आरोपी पसार झाले होते. दरम्यान पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्याने वन विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका होत आहे. परिसरातील वन्यजीव संरक्षणाची जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी योग्य वेळी कार्यवाही न केल्यास शिकाऱ्यांचे धाडस वाढत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर नीलगाईच्या (रोही)च्या ताज्या शिकार प्रकरणाची सखल चौकशी करून दोषींवर तत्काळ कार्यवाही करून अटक करावी तसेच काळी( दौ.) वनविभागातील संबंधित बेजबाबदाररावर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कार्यवाही व्हावी असी वन्यजीव प्रेमीतुन मागणी होत आहे.

सदर घटनेत नीलगाय (रोही) या प्राण्याच्या बॉडीचे पोस्टमार्टम चालू आहे. तीन वाजताच्या दरम्यान घटनेची माध्यमांना माहिती देण्यात येईल…सम्राट मेश्राम..वनपरिक्षेत्र अधिकारी वनपरिक्षेत्र कार्यालय,काळी (दौ.)