चिमूर विधानसभेत काँग्रेसला खिंडार. वार्जुरकरांचा भाजपात प्रवेश

✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.27 फेब्रुवारी) :- 

      चिमूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा गड टिकवण्यात वार्जूरकर कुटुंबाने अथक मेहनत घेतली होती. मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे महाराष्ट्र खणीकर्म विकास महामंडळ माजी अध्यक्ष तथा माजी आमदार अविनाश वार्जुकर. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतीश वारजुकर तसेच महाराष्ट्र युवा काँग्रेसचे महासचिव तथा सरपंच साईश वारजुकर. पलाश वारजुकर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या उपस्थितीत मुंबईत रीतसर प्रवेश झाला असून काँग्रेस पक्षाला मात्र खिंडार पडल आहे.

         चिमूर विधानसभा हा पूर्वी काँग्रेसचा मजबूत गड होता. नंतर अपक्ष डॉ रमेश गजभे यांनी आमदारकी मिळविली. त्यानंतर डॉ अविनाश वारजुकर यांनी पुन्हा हा गड काँग्रेसकडे आणला. पुढे विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेतून उभे राहून या गडाला तडा दिला काही वर्षांनी वडेट्टीवार यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमधे प्रवेश केला. त्यामुळे वडेट्टीवार आणि वार्जुरकर यांच्यात अस्तित्वाची लढाई सुरू झाली.

या अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत कीर्तीकुमार भांगडीया यांनी काँग्रेसला कमकुवत केले. वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी क्षेत्र निवडला मात्र वार्जुरकर परिवाराने काँग्रेस मजबूत ठेवण्याचे काम सुरू ठेवले. डॉ सतीश वार्जुकर यांचा दोन वेळा पराभव झाला असला तरी तो निसटता पराभव होता. विधानसभा ते नगरपालिकांच्या निवडणुकीत एकत्र येणाचा देखावा दाखवला तरी अंतर्गत संघर्ष थांबला नाही प्रत्येक ठिकाणी काँग्रेसला गटबाजीचा फटका बसला या सगळ्या अंतर्गत कहलाला कंटाळून वार्जुरकर कुटुंबाने भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतला. आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून आणली. व आज आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या नेतृत्वात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र खणीकर्म विकास महामंडळ अध्यक्ष व माजी आमदार अविनाश वारजुकर. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ सतीश वार्जुकर तसेच महाराष्ट्र युवा काँग्रेसचे महासचिव तथा सरपंच साइश वार्जुरकर. व पलाश वार्जुरकर यांनी मुंबई येथे भाजपा पक्षात प्रवेश केला. वारजुकर यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.