✒️शेख रफिक माहूर(Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.27 जानेवारी) :-
सर्व श्रेष्ठ मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्या, चांगले शिक्षण देण्याकडे लक्ष द्या आजच्या युगात शिक्षनाला महत्त्व आहे.आपल्या मुलींना व मुलांना इस्लामिक शिक्षण कमी असल्यामुळे ते चुकीच्या वळणावर जात आहे त्यांना इस्लामिक व धार्मिक शिक्षण देने गरजेचे आहे असे मौलाना मुफ्ती मोहसीन सहाब यांनी जलसामध्ये जमलेल्या समुदायास संबोधित करताना व्यक्त केले.
माहूर तालुक्याच्या वाई बाजार येथील जामिया मिल्लीया इशाअतुल इस्लाम या मदरशात दिनांक 25 जानेवारी रविवार रोजी सकाळी 11 वाजता 28 वा जलशाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये हिंदुस्तान की जंगेआजादी मे मुसलमानो का किरदार, मदारिसे इस्लामिया व असरी उलूम की अहमियत,इस्लाम मध्ये महिलांना मुखाम और उनकी अहेमियत या तीन मुद्यावर मार्गदर्शन तसेच मदरसा मधील विद्यार्थ्यांनी कुराणची आयत चे वाचन, तकरीर, नात म्हणून दाखवले.वाई बाजार येथील जामिया मिल्लीया इशाअतुल इस्लाम या मदरशातील 13 विद्यार्थ्यांना कुराण पठणाची सनद देण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
यात ते बोलत होते.पुढे बोलताना मौलाना म्हणाले की आपल्या इस्लाम धर्मा मध्ये आयुष्य जगत असताना नमाज पठण करणे,कुराण वाचन करणे, आणि इतरांना त्रास होणार नाही असे जीवन जगा, आपल्या आई वडिलांची सेवा करा, चांगले शिक्षण देण्याकडे लक्ष द्या अशा वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जेरे सदारात मुफ्ती मोहम्मद मोहसीन कासमी औरंगाबाद, डॉ मुफ्ती मोहम्मद आजम साहब कासमी,हजरत मौलाना जुनेदूर रहेमान आजाद साहब कासमी,यांची उपस्थिती होती.तसेच या मदरसा चे सदर हाजी उस्मान खान सहाब,कारि अब्दुल बशीर साहब,हाजी ईसा खान साहब,मौलाना उस्मान,मौलाना निसार,मौलाना सलमान,हाफिज अनवर,हाफिज सलमान,मुफ्ती जुनेद,मौलाना जरीफ यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिसरातील चांगले काम करणाऱ्या मुस्लिम बांधवाना अवॉर्ड देऊन सन्मान केले. कुराणचे पठण केलेले 13 हाफिज झालेल्या विद्यार्थ्यांना शाल व सनद देऊन सन्मानित करण्यात आले.
या जलशाला किनवट माहूर तालुक्यातील मोठ्या हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.तसेच मुस्लिम महिलांची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.उपस्थित बांधवांची खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाच्या शेवटी मुफ्ती मोहम्मद मोहसीन कासमी यांनी दुवा केली.मदरशाचे मुफ्ती शफीयोद्दीन यांनी आलेल्या प्रमुख उपस्थिती मान्यवरांचे व उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.







