🔸उत्कृष्ट सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार
✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.25 जानेवारी) :-
येथील एसटी आगारात शनिवारी सकाळी ११ वाजता चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक रोशन मेहर होते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय उपाधीक्षक (टीआरपी) व प्रा. संजय पिठाडे, पत्रकार रामदास हेमके, वाहतूक शिपाई ठोंबरे, वाहतूक निरीक्षक इम्रान शेख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट केपिटाईल देणारे तसेच विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन लिपिक होमराज सिडाम यांनी केले तर आभार लिपिक नेहा मेश्राम यांनी मानले.
यावेळी प्रा. संजय पिठाडे यांनी, “प्रत्येक जण आपल्या जीवनात कुठे ना कुठे चालक असतो—कोणी कुटुंबाचा, तर कोणी समाजाचा. मात्र एसटीचा चालक हा अनेक कठीण परिस्थितीला सामोरे जात प्रवाशांना सुरक्षित सेवा देतो,” असे मत व्यक्त केले. आगार व्यवस्थापक रोशन मेहर तसेच राजकुमार चुनारकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून चालकांच्या योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमास आगारातील अधिकारी, कर्मचारी व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







