आर्णी बस स्थानकातील 26 जानेवारी ला ध्वज घाण कचऱ्यात फडकवू नये..आगार प्रमुख दारव्हा/आर्णी व विभाग नियंत्रक यवतमाळ यांना बहुजन मुक्ती पार्टीची मागणी

✒️यवतमाळ(Yavatamal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि.23 जानेवारी) :- 

      बस स्थानकातील 26 जानेवारी ला ध्वज फडकवण्यात येत असलेला झेंडा हा घाण व कचऱ्या मध्ये असल्यामुळे तो त्याठिकाणावरून हटवून दुसऱ्या ठिकाणी ध्वज फडकविण्यात यावा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाने यांनी केली आहे.

       सविस्तर वृत्त असे की, 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.

26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणतात, कारण याच दिवशी १९५० मध्ये भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले, ज्यामुळे देशात लोकशाहीची सुरुवात झाली. हा दिवस भारताचा राष्ट्रीय सण असून, संविधान आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण म्हणून प्रत्येक सरकारी व निमसरकारी कार्यालयात भारतीय ध्वज म्हणजे तिरंगा झेंडा फडकवल्या जातो.

परंतु आर्णी बस स्थानकातील झेंडा हा घाण, मुतारी व कचऱ्या मध्ये फडकवल्या जाणार असल्याचे दिसून येत आहे हा राष्ट्रीय ध्वजाचा अपमान नाही? जर राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्यास कायद्याने गुन्हा ठरत असेल तर घाण, मुतारी व कचऱ्याच्या त्या ठिकाणी पाच मिनिट सुद्धा एखादा व्यक्ती थांबू शकत नाही त्याठिकाणी चालक,वाहकांना उभे करून झेंडावंदन करतांना चालक,वाहक व ईतर कर्मचारी उभे राहू शकतील? वरील सर्व बाबींचा विचार करून सद्यस्थितीत ज्या ठिकाणी झेंडा आहे त्याठिकाणाहुन हटवून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात येवून ध्वज फडकवण्यात यावा.अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाने लोकसभा अध्यक्ष यवतमाळ/वाशीम, भुवन मुनेश्वर प्रदेश अध्यक्ष भारतीय बेरोजगार मोर्चा, गजानन गोडसे, विपुल चव्हान राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ, सतिश कांबळे तालुका अध्यक्ष राष्ट्रिय किसान मोर्चा आर्णी येथील सुज्ञ नागरिकांनी आगार प्रमुख दारव्हा/आर्णी व विभाग नियंत्रक यवतमाळ यांना प्रसिद्धी माध्यमाद्वारे केली आहे.