पैनगंगा नदी पात्रातील टाकळी पेंडावर भरला वाळू चोरणाऱ्या ट्रॅक्टरांचा मेळावा

🔸चोले पेंड पाठोपाठ टाकळी पेंढावरून वाळू चोरी जोरात सुरू 

🔹ग्रामीण रुग्णालयासमोरील कुट्टन ओट्यावरून मोठ्या पक्षाचे पदाधिकारी करतात दलाली 

🔸सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला शासकीय कामात व्यस्त असल्याचा घेत आहेत वाळू तस्कर फायदा

✒️शेख रफिक माहुर(Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.23 जानेवारी) :- 

माहूर तालुक्यातील तालुक्यातून गेलेल्या पैनगंगा नदी पात्रावरील विविध वाळू घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असून या तस्करीचे व्हिडिओ व्हायरल होऊनही जबर कारवाया होत नसल्याने वाळू तस्करांची हिंमत वाढून चोले पेंड पाठोपाठ आता गाजलेल्या टाकळी पेंडावरूनही वाळू चोरी सुरू झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने महसूल व पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत .

पैनगंगा नदी पात्रावरील पाच वाळू घाट लिलाव झाले असून लिलावधारकाने शासनाचा कोट्यावधीचा लिलावात घपला केल्याने अद्याप घाटावरून अधिकृत वाळू विक्री सुरू केली नसल्याने नागरिकांना बांधकामासाठी वाळूची गरज पाहून वाळू तस्करांनी तोंड वर काढत प्रसिद्ध चोले पेंड टाकळी सायफळ दिगडी कुत्तेमार कुपटी परिसरातील दीडशेवर ट्रॅक्टर टिप्पर द्वारे वाळू चोरी करून नागरिकांना भरमसाठ किमती घेऊन विक्री केली जात आहे .

महसूल व पोलीस विभागातील अंदरची कामे करणारे काही कर्मचारी तसेच मोठ मोठ्या पक्षाचे पदाधिकारी या वाळू तस्करीच्या धंद्यात लिप्त असल्याने मोठ्या अधिकाऱ्यांना सदरील चोरीचा पत्ता लागू देत नसल्याने अधिकारी हतबल दिसत असून अनेक वेळा ओरड होऊनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर तहसील कार्यालयाला आणखी एक वाहन अग्निशस्त्र उपलब्ध करून दिले नसल्याने वाळू तस्कर हल्ला करतील या भीतीने आता महसूल पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी रात्रीला वाळू घाटावर जाण्यास धजावत नसल्याने रात्रभर मजुरासह बोट लावून वाळू तस्करी सुरू असून वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळताच गेलेल्या कर्मचाऱ्यांना फक्त तराफेच हाती लागत असल्याने महाराष्ट्र शासनापेक्षा वाळू तस्करांचे हात भक्कम असल्याची प्रचिती प्रचंड प्रमाणात होत असलेल्या वाळू तस्करी वरून दिसत आहे.

अनेक गावात छाटछूट वाळू तस्कर ट्रॅक्टर द्वारे चोरी करीत असल्याने या चिल्लर ट्रॅक्टर धारकांना सापळा रचून पकडण्यात येते परंतु मौजे चोले पेंड आणि टाकळी येथून दिवस रात्र सुरू असलेली वाळू चोरी महसूल पोलीस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिसत नसल्याने याचीही जोरदार चर्चा रंगली असून घरकुलासाठी मोफत वाळू वाटणाऱ्यावर धाड टाकून त्याचे साहित्य जप्त करणारे सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला हे शासकीय कामात व्यस्त असल्याचा फायदा वाळूतस्कर घेत असून या दोन्ही पेंढावरील वाळू तस्करांना का मूभा देण्यात आली असा सवाल ही खाजगीत वाळू तस्कर करत आहेत.