🔹ॲड. विश्वजित मारोतराव कोवासे यांचा सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस साजरा
✒️ महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि .17 जानेवारी) :-
वाढदिवस डीजेच्या तालावर गाजवण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करून साजरा करणे हेच खरे वाढदिवसाचे फलित आहे, असे प्रतिपादन भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा बहुद्देशीय आदिवासी विकास मंडळ, गडचिरोलीचे उपाध्यक्ष मा. ॲड. विश्वजित मारोतराव कोवासे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या सेवेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
ॲड. कोवासे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री एम. एस. कोवासे कॉलेज ऑफ फार्मसी, मुरखडा गडचिरोली तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात एकता निवासी मूकबधिर विद्यालयाला भेट देऊन करण्यात आली. यावेळी मूकबधिर विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीचा फराळ, तिळगुळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून संक्रांतीचा गोडवा द्विगुणित करण्यात आला.
त्यानंतर श्री एम. एस. कोवासे कॉलेज ऑफ फार्मसी येथे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत महाविद्यालयीन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली येथे रुग्णांना फराळ व फळांचे वितरण करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात रक्तदान करून सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविले. तसेच निवासी मूकबधिर विद्यालय मुरखडा, निवासी अपंग विद्यालय लांझेडा येथे फळे व फराळाचे वाटप करण्यात आले.
याशिवाय आय.टी.आय. चौक व चामोर्शी रोड येथील वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फळवाटप करून संक्रांतीचा गोडवा वाटण्यात आला व त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.
हा कार्यक्रम श्री एम. एस. कोवासे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रफुल एन. गिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी प्रा. कु. पल्लवी निखाडे, प्रा. श्री. स्वप्नील डोईजड, प्रा. कु. विश्वेश्वरी ढोरे, प्रा. कु. हितेश्वरी राजगडे, प्रा. कु. रोशनी वड्डे, प्रा. कु. याशिका दुर्वे, लिपिक श्री. चंचल रोहनकर, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. शुभम कुंडलकर, श्री. निशांत कुलमेथे, कु. प्रांजली कडसकर, कु. सीमा चापले, वाचनालय प्रमुख कु. दीपाली आत्राम तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.







