सिकलसेल मुक्त गडचिरोलीसाठी कटिबद्ध! ‘अरुणोदय’ अभियानाचा शुभारंभ

✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.16 जानेवारी) :- 

आज गडचिरोली जिल्हा परिषद, आरोग्य विभागातर्फे आयोजित ‘सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’ आणि ‘अरुणोदय’ उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहिलो.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिकलसेलचे प्रमाण चिंतेची बाब आहे. आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सिकलसेल व्याधीग्रस्त (Disease) सुमारे ३००० रुग्ण आहेत, तर ४३,००० नागरिक हे वाहक (Trait) आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत, तर जनजागृती आणि योग्य वेळी निदान होणे अत्यंत गरजेचे आहे.

आजच्या कार्यक्रमात मी प्रामुख्याने महिलांच्या आरोग्यावर भर दिला. आपल्या भगिनींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण अनेकदा ९ ते १० पर्यंत असते, जे १२ ते १५ असणे अपेक्षित आहे. यासाठी केवळ गोळ्या-औषधांवर अवलंबून न राहता, घरातील पोषक आणि नैसर्गिक आहार घेण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन मी केले.

अभियान कालावधी: १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६

या कालावधीत नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी आणि उपचार घ्यावेत.

निरोगी गडचिरोलीसाठी आपण सर्वजण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊया!