✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.16 जानेवारी) :-
महागाव नगरपंचायतीच्या वतीने मकर संक्रात या दिवसाच्या औचित्य साधून प्रभाग क्रमांक १४ मध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार राजूभाऊ नजरधने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना त्यांनी अत्यंत स्पष्ट व ठाम शब्दांत सांगितले की, “मी कोणत्याही पक्षात असो वा नसो, माजी आमदार या नात्याने माझा प्रशासकीय अनुभव वापरून महागाव शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही व सर्वतोपरी शासन स्तरावर प्रत्येक विकास कामासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .
महागाव नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराचा चेहरा-मोहरा बदलून दाखवू,” असा विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महागावच्या विकासाबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
या कार्यक्रमास महागाव शहराचे सहकार महर्षी श्री. संभाजीराव नरवाडे दादा यांचीही उपस्थिती लाभली. त्यांनीदेखील “महागाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जिथून-जिथून शक्य होईल.







