✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
Warora(दि.16 जानेवारी) :-
वरोरा तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येत असलेल्या मशाचा पाट या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करत असताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.शेगाव पोलीस स्टेशनने या घटनेवर गुन्हा नोंदविला आहे.
सविस्तर वृत्त असे की बुधवारी रात्री १२.०० वा. च्या दरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर त्यांचा पाठलाग सुरू झाला होता . एक ट्रॅक्टर वेगाने पळ काढत असताना खड्डा आल्याने थांबवण्यात आले. त्याचवेळी ट्रॅक्टरचे वजन कमी करण्यासाठी त्याची हायड्रोलिक ट्रॉली वर केली गेली, ज्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेला ३५ वर्षीय कामगार प्रवीण वसंत दडमल (निवासी: चारगाव बु.) खाली पडला आणि त्यावर वाळूचा ढीग कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.
इतर कामगार घटनास्थळावरून पळून गेले.
फिर्यादी नामे गोपिका वसंता दडमल यांच्या फिर्यादीवरून अप क्रमांक 21/25 कलम 106(1),49 भारतीय न्याय संहिता अन्वये शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास psi कांबळे साहेब, मदन येरमे करीत आहे.







