शिक्षकांच्या सूचनांचे काटेकोर पालन केल्यास यश निश्चित; आ. नगरधने

✒️विश्वनाथ महामुने महागाव ( Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.4 जानेवारी) :- 

महागांव येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच नवभारत प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 स्नेहा संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार राजेंद्र नगरधने हे होते.आ नजरधने यांनी व्यासपीठावरून विद्यार्थ्यांजना संबोधित केले.

   विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन अध्यायना संदर्भात शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांनी शिस्त,परिश्रम, कसोटी आणि शिक्षकांवरील विश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.

तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेले कलागुण विचार मंचावर सादर केल्याशिवाय आत्मविश्वास वाढण्यास मदतच होईल, असे प्रसंगी प्रतिपादन त्यांनी केले. स्नेहा संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ.सुनंदाताई दिलीपराव कोपरकर उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे व्यवस्थापक संभाजीराव नरवाडे, नवभारत विद्यालयाचे व्यवस्थापक विलासराव नरवाडे, शाळा समितीचे सदस्य भगवानराव नरवाडे , पंजाबराव पवार, सुभाषराव नरवाडे, नगरसेवक शैलेश कोपरकर, गजानन पाटील,संतोष हुम्बे, साहेबराव सूर्यवंशी,महेंद्र कावळे आदींची उपस्थिती होती. स्नेहसंमेलन

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संभाजीराव नरवाडे यांनी मार्गदर्शन केले, त्यांनी बोलतांना सांगितले “विद्यार्थ्यां मधील सुप्त गुणांचा विकास, वक्तृत्वकला, आत्मविश्वास व आपले विचार मांडण्याचे धैर्य हे अशा प्रकारच्या स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमांतूनच विकसित होते. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.

उद्घाटना नंतर विद्यार्थ्यांनी एकल, दुहेरी व सांघिक संगीत सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या सोबतच अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित प्रभावी नाटिकांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला शहरासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने महिला पालक वर्गाची विशेष उपस्थिती होती‌. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व नवभारत प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव धात्रक यांनी केले, तर आभार श्रीकांत कदम यांनी मानले.

दरम्यान, 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर वक्तृत्व कला, प्रबोधन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.