🔸सामाजिक कार्यकर्ते रमेश राठोड यांची जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.26 डिसेंबर) :-
पेढी (ई.) येथील विविध कार्यकारी सोसायटी मधील अनेक संचालक कर्जबाजारी,थकीत कर्जदार आहेत, असे असतांना येथील संचालक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर कार्यरत आहेत. ही बाब कायद्याच्या चौकटीत बसणारी नसून नियमबाह्य आहे. सहकार विभागातील कायद्याच्या चौकटीतील नियमानुसार कर्जबाजारी व थकीत कर्जदार संचालक व्यक्ती ही कोणत्याही सहकारी संस्थेचा संचालक म्हणून ग्राह्य धरल्या जात नाही. तसेच अशा संस्थेला कोणताही वैद्य प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार देखील नसतो, अशी रीतसर तक्रार पेढी( ई.)येथील संचालकावर दाखल करण्यात आली.
पेढी ( ई.) विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये बहुतांश संचालक हे थकीत कर्जदार व कर्जबाजारी असल्यामुळे संस्था स्वतःच बरखास्त होण्याच्या पात्रतेत येत असतांना देखील संबंधित सोसायटीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी पाठवीत असल्याचा आरोप रमेश राठोड (सातघरी) यांनी जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक सहकार अधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या तक्रारीतून केला आहे. जो संचालक पूर्णतः अपात्र व थकीत कर्जदार व कर्जबाजारी असलेल्या संस्थेच्या प्रतिनिधीस मतदानाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे पेढी(ई.) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वरील थकीत कर्जदार व कर्जबाजारी संचालक मंडळाची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी सातघरी येथील रमेश बाबुलाल राठोड यांनी जिल्हा निबंधक व सहाय्यक निबंधक सहकार अधिकारी यांच्याकडे 16 डिसेंबर 2025 रोजी केली आहे. नेमके सहकार विभागाचे अधिकारी यावर कोणती कार्यवाही करतात? की थकीत संचालकांना पाठीशी घालतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






