श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.26 डिसेंबर) :- 

श्री संत संताजी जगनाडे महाराजांची ४०१ वी जयंती दि.२७ डिसेंबर ला साजरी होणार आहे. या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी समाज बांधवांनी सहपरिवार कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे. महाराजांच्या जन्मोत्सवाचा सोहळा श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान कार्यालय, पटवारी भवनाचे मागे, सर्वोदय वार्ड आरमोरी रोड गडचिरोली येथे होणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

शनिवार दि. २७ डिसेंबर ला सकाळी १० वाजता कार्यालयातून श्री संताजी ची पालखी व मिरवणूक निघणार आहे. ती पालखी गडचिरोली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत परत कार्यालयात येणार आहे. दुपारी १२ वाजता प्रमुख मान्यवरांचे कार्य कार्यक्रम स्थळी आगमन होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती प्रमोद राव तरारे अध्यक्ष महाराष्ट्र विक्री कर, न्यायाधिकरण मुंबई हे लाभणार आहेत.तसेच जगदीश वैद्य अध्यक्ष नागपूर विभागीय महा. प्रा. तैलिक महासभा, तुषार दूधबावरे विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय कुणघाळा यांची उपस्थिती राहणार आहे.

दुपारी १:३० वाजता गायक राज प्रल्हादराव रायते व संच यांच्या सुप्रसिद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

दुपारी २:३० वाजता तेली समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार होणार आहे. तसेच दुपारी ३:३० रक्तदान शिबिराचे आयोजन पवनसुत सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या नंतर लगेचच सहभोजन आयोजीत करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला येताना सर्व पुरुष मंडळींनी पांढरा गणवेश व महिलांनी पिवळी साडी परिधान करून यावे अशी सुद्धा विनंती करण्यात आली आहे.

कार्यक्रमाला समाजातील अधिकाधिक समाज बांधवांनी हजर राहावे असे आवाहन प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के, प्रा. देवानंद कामळी, एड. रामदास कुंघाडकर, बाबुराव कोहडे, रवींद्र निंबोरकर, रमेश कांबळे, गोपीनाथ चांदेवार, विष्णूजी कांबळे, प्रफुल आंबोरकर, भैयाजी सोमनकर, कुणाल भांडेकर, घनश्याम लाकडे, भगवान ठाकरे, रवींद्र ठाकरे, राहुल भांडेकर व आयोजकांनी केले आहे.