महागाव येथे लोक अदालती द्वारे 94 प्रकरणांचा जलद निपटारा

🔸दिवाणी न्यायाधीश एस. आर. जैन यांचे यशस्वी आयोजन

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.14 डिसेंबर) :- 

13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित लोक अदालत मध्ये एकूण 94 प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. ही लोक अदालत दिवाणी न्यायाधीश श्री. एस. आर. जैन सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सलग पार पडली.

या लोक अदालतसाठी अ‍ॅड. एस. पी. देशमुख, अ‍ॅड. नरवाडे, अ‍ॅड. आकाश साबळे तसेच अ‍ॅड. एस एन कवाने व अ‍ॅड. कापसे हे वकील उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे प्रकरणांचा तडजोडीने व सुलभ मार्गाने निपटारा करण्यात आला.

यावेळी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असून मोटार वाहन कायदा कलम 66 व 192, तसेच कलम 283 व 285 अंतर्गत प्रकरणे, दीवानी दावा तसेच खावटीची प्रकरणे निकाली काढण्यात आली.

कोर्टाच्या कामकाजात सहाय्यक अधीक्षक तळेगावकर, वरिष्ठ लिपिक एस. जी. मदने, आर. आर. शिंदे व इतर न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. लोक अदालत यशस्वीपणे पार पडण्यासाठी संपूर्ण न्यायालयीन कर्मचारीवर्गाने मोलाचे सहकार्य केले.

लोक अदालतच्या माध्यमातून नागरिकांना जलद, कमी खर्चात व तणावमुक्त न्याय मिळत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.