श्री दत्त जयंती यात्रेवर बिबट्याच्या दहशतीचे सावट 

🔸भाविकांच्या सेवा सुविधेला प्राधान्य द्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सव आढावा बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांचे उपस्थित अनुपस्थित अधिकाऱ्यांना आवाहन

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.28 नोव्हेंबर) :- 

श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे होणाऱ्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने श्री दत्त शिखर संस्थान सह इतर ठिकाणी लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे झालेल्या बैठकीत जंगलात मोकाट फिरणारे अनेक बिबटे यात्रेत धुडगूस घालू शकतात त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बैठकीत पाचारण करण्यात आले होते परंतु त्यांनी प्रतिनिधी पाठविल्याने तोंडावर आलेल्या यात्रा महोत्सवात या बिबट्यांचा कसा बंदोबस्त करणार असा प्रश्न उपस्थित झाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यास सक्त सूचना देऊन यात्रेत बिबट्यामुळे अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना देऊन सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी भाविकांना सोयी सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन दि 27 रोजी माहूरच्या पंचायत समिती मधील कै वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या बैठकीत केले.

परंपरेप्रमाणे दरवर्षी श्री दत्त शिखर संस्थान येथे दत्त जन्म सोहळा मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात येतो या सोहळ्यात लाखो भाविक भक्त उपस्थित राहून दत्त नामाचा गजर करत असतात श्री दत्त शिखर संस्थान सह शहरातील श्री देव देवेश्वर संस्थान येथेही दत्त जन्म सोहळ्यास लाखो भाविकांची उपस्थिती असते तर श्री आनंद दत्त धाम आश्रम साईनाथ महाराजांच्या मठातही लाखावर भाविक कर्मचारी दत्त नाम जपण्याकरता सतत सात दिवस मुक्कामी राहतात .

त्यामुळे गडावर येणाऱ्या लाखो भाविकांना कुठलीही असुविधा जाणवू नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली परंतु या बैठकीत अनेक अधिकारी मीटिंग च्या नावावर गैरहजर होते तर त्यांनी प्रतिनिधी पाठवत अपुरी माहिती सादर केल्याने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना सर्व अनुपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

या बैठकीत नायब तहसीलदार कैलास जेठे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम यांचे सह सहाय्यक गवीअ पिडी मुरादे तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर डी माचेवार मराविमचे अभियंता आर बी शेंडे वैद्यकीय अधिकारी डॉ ए डी आंबेकर आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड राष्ट्रीय महामार्गाचे क अभियंता ए जी हजारे यांनी कनिष्ठ अभियंता पी एल कांबळे हे प्रतिनिधी पाठविले होते.

क अभियंता पी व्ही हंचाटे श्री दत्त शिखर संस्थानचे व्यवस्थापक जी एन नाईक पो का गजानन जाधव नको चे कार्यालय अधीक्षक एस एस गजलवाड विजय शिंदे मंडळाधिकारी चंदनकर व्ही आर चिभडे आगारप्रमुख पंस चे एम एम लोणीकर तलाठी सी पी बाबर देव देवेश्वर संस्थानचे विश्वस्त एस एल कोथळकर वनरक्षक एन बी दुर्गे श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे पत्रकार विजय आमले वसंतराव कपाटे नंदकुमार जोशी सर इलियास बावाणी गजानन भारती राज ठाकूर सौ सुरेखा तळणकर यांचे सह मान्यवर उपस्थित होते.