✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.7 नोव्हेंबर) :-
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या ‘ट्रायबल फॅशन शो ‘मध्ये चारगांव मधील आदिवासी कलाकार नी आपल्या अद्वितीय प्रतिभेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या भव्य सोहळ्यात चारगांव च्या तरुणी नी केवळ पारितोषिकेच पटकावली नाहीत, तर आदिवासी परंपरेचा गौरवशाली ठसा उमटवला. या स्पर्धेत आराध्य वटे हिने प्रभावी सादरीकरण करून पहिली किड्स कोयाक्वीन नागपूर हा मानाचा किताब आपल्या नावी केला.
या कार्यक्रमाचे आयोजन जय सेवा नागपूर संस्थेचे प्रफुल धुर्वे यांनी २ नोव्हेंबर रोजी केले होते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गडचिरोलीसारख्या राज्यांतील ४५ हुन अधिक आदिवासी जमातींचे कलाकार या रंगीबेरंगी सोहळ्यात सहभागी झाले होते. मंचावर प्रत्येक कलाकाराने आपल्या संस्कृतीचे, वेशभूषेचे आणि परंपरेचे दैदिप्यमान दर्शन घडवले.
या सर्व परंपरा, कला आणि संस्कृतीचा जलवा
जबाबदारी आहे. आधुनिक माध्यमांच्या मदतीने आम्ही आमची संस्कृती जगभर पोहोचवत आहोत. – आराध्य वटे, किड्स कोयाक्वीन नागपूर विजेता
कलाकारांनी केवळ रंगमंचावरच नव्हे, तर यूटयूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या माध्यमांद्वारेही आदिवासी संस्कृतीचा प्रचार करत ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे नवे पालन खुले केले आहे.







