राजुरा शहरात बतुकम्मा देवी उत्सव उत्साहात साजरा 

🔸मान्यवरांच्या उपस्थितीत सामुहिक नृत्यांनी भक्त झाले तल्लीन   

✒️ सौ सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि.30 सप्टेंबर) :- 

                  तेलगू भाषिकांचा बतुकम्मा देवी उत्सव राजुरा शहरात नगर पालिकेशेजारच्या प्रांगणात दिनांक २९ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा झाला. सुमारे १८० किलोग्रॅम सात रंगाच्या फुलांनी सुंदर व आकर्षकरित्या सजविलेल्या बतुकम्मा देवीच्या सभोवती भक्तीगीताच्या चालीवर सामुहिक नृत्य करीत महिलांनी आनंद व्यक्त करीत आपल्या मनोकामना पुर्ण व्हाव्या म्हणून देवीला साकडे घातले. या उत्सवाचे उद्घाटन समितीचे मार्गदर्शक स्वामी येरोलवार यांनी केले. या समारोहात तेलगू भाषिकांसोबतच मराठी भाषिक लोकही सहकुटुंब उत्साहात सामिल झाले. यानिमित्ताने विवाहित मुली व जावई यांना पाचारण करून त्यांना कपडे देऊन सत्कार करण्यात आला. रात्री ११ वाजता देवीचे विसर्जन करण्यात आले. 

             या उत्सवात आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे, माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, रमेश नळे, सतीश धोटे, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, ठाणेदार सुमित परतेकी, डाॅ.अशोक जाधव, डाॅ. लहू कुळमेथे, डाॅ. बांबोडे, राजेश कतवारे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संदीप जैन, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल बाळसराफ, पत्रकार प्रा.बि.यु. बोर्डेवार, डाॅ.उमाकांत धोटे, सिध्दार्थ पथाडे, सुरेश रागीट, अरूण म्हस्की यांचेसह मोठ्या संख्येने राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. 

              या उत्सवासाठी बतुकम्मा देवी उत्सव समितीचे मार्गदर्शक स्वामी येरोलवार, क्रिष्णा कुमार, पवन चिंतल, सदया इरावेणी, श्रीनिवास बंडारी, रमेश पेड्डी, राकेश नामेवार, केशव त्रिवेदी, सुरज ताटपल्लीवर, क्रिष्णा गेडाम, राकेश शिगरी, भाष्कर बोल्लू, प्रकाश चेन्नरवार, श्रीनिवास वलाला, ओबुलेसू गावीनी, शुभांगी गेडाम, अखिला येरोलवार, स्वेता येरोलवार, रूपा बोल्लु, विशाखा चिंतल, कृष्णावेणी तिरिवेदी, शारदा भंडारी, शारदा इरवेनी, शिल्पा नामेवार, दिव्या सिगारी, मानसी सिगारी, सरिता पेद्दी, अश्विनी ताटपल्लीवार, किरण कुमार, रमा चेन्नूरवार, महेश्वरी गावीनी, सुजाता वालाला यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.