✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.30 सप्टेंबर) :-
30 सप्टेंबर रोजी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुडाणा ता. महागाव येथे अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची, नुकसान झालेल्या शेत शिवाराची पाहणी करण्या करिता मुडाणा येथे आले, परंतु मागील आठवड्यात तालुक्यातील दहिसावळी येथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची हृदय द्रावक घटना घडली असताना आज पावेतो खासदार महोदयांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना साधी सांत्वनपर भेटघेत विचारपूस करण्याचे औचित्य दाखविले त्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबियाकडे खासदारांनी जणू पाठच फिरवली की काय? असा प्रश्न उद्भवत आहे.
यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ते 30 सप्टेंबर रोजी मुडाणा गावात दाखल झाले. शासनाकडून नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याचे सांगितले. परंतु महागाव तालुक्यात दहिसावळी एकाच गावात दोन शेतकऱ्यांनी 21 आणि 24 सप्टेंबर रोजी तीनच दिवसाच्या फरकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. परंतु खासदारांनी आजपर्यंत दहीसावळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेटी देण्याचे टाळले. मुडाणा परिसरात आपली उपस्थिती दाखवून दौरा गुंडाळण्यात आला. त्यामुळे खासदार महोदयांच्या बाबतीत शेतकऱ्यांतून प्रचंड नाराजीचा सूर निघत आहे.
या वेळी प्रशासनाचे कर्मचारी मंडळअधिकारी राम पंडित, शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, विशाल पांडे,भिमराव भालेराव, तालुका प्रमुख रविंद्र भारती,उपतालुका प्रमुख नानाभाऊ पानपट्टे, सरपंच वैभव बरडे, उपसरपंच अशोक वानखेडे,माजी उपसरपंच रमेश जाधव, गजानन पाटील,अतुल येनकर, दत्ता दांडेगांवकर, गोलू पठाण, शरद गोभे, राहुल वानखेडे, रवि जाधव, जितू चव्हाण तसेच तलठी बोक्षे मॅडम हजर होत्या. मुलांना येथील नुसकानग्रस्तांची पाहणी झाली हे ठीक आहे परंतु दहा दिवसाचा कालावधी उलटला तरी दहिसावळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना खासदार महोदयांनी अद्याप भेट घेण्याचे टाळले आहे.







