🔸प्राथमिक शिक्षण,शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याचा प्रश्न, सोबतच आरोग्यासाठी महत्त्वाचे असणारे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी जनजागृतीचे सामाजिक कार्यात तत्पर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांचा पुढाकार
,✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.5 सप्टेंबर) :- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ज्याला आयुष्यमान भारत योजना म्हणून संबोधले जाते. या योजने अंतर्गत गोरगरीब आणि गरजू कुटुंबातील व्यक्तींना पाच लाखा पर्यंत मोफत आरोग्य संरक्षण दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढणे अत्यावश्यक आहे. याच मुख्य उद्देशाने गरजू कुटुंबातील व्यक्तींना ह्या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा म्हणून आयुष्यमान कार्ड काढणे गरजेचे आहे. या साठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लोक जागृतीचे कार्य हाती घेतले आहे.
शेवटच्या गरजू व्यक्तींना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा हेतूने आरोग्य विभाग मार्फत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला आरोग्य योजनेची माहिती झाल्यास सर्वसामान्यांना आर्थिक अडचणी शिवाय उत्कृष्ट आरोग्यसेवेचा लाभ घेता येईल. आपल्या आरोग्य उपचारासाठी खाजगी ठिकाणी आर्थिक भुर्दंड बसणार नाही. त्या साठी प्रत्येक गावी आयुष्यमान कार्ड काढून घेण्या बाबत माहिती व जनजागृती आरोग्य विभाग या मार्फत व्हावी, यासाठी उटी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी महागाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसेनजीत धूळधुळे यांना आपल्या सहकार्या सोबत लेखी निवेदन दिले.
या प्रसंगी उटी ग्रामपंचायतच्या सरपंच्या सौ. ज्योती वानखेडे, टेंभीचे सरपंच अमोल चिकने, पोहंडुळ येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश रावते, गणेश वानखेडे, अमोल शिंदे, ज्ञानोबा नावाडे, मंगेश देशमुख, कैलास ठेंगे, रामेश्वर वानखेडे, गजानन मैंद,अनिल गावंडे ,विनायक सोनुले, सुनील वानखेडे ,प्रसाद गावंडे, विनोद मैंद, अक्षय गावंडे, गजानन पानपट्टे यांचेसह निवेदन देतांना उटी, टेंभी, कलगाव, पोहंडुळ, कान्हा पिंपळगाव येथील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थीत होते.







