✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.2 सप्टेंबर) :- वरोरा तालुक्यातील शेगाव(बु) येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत राळेगाव येथे पुंडलिक नन्नावरे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली यात श्री सचिन भाऊ डुडुरे यांची तंटामुक्त अध्यक्षपदी सर्वानुमते एकतर्फी निवड करण्यात आली.
या सभेला पुंडलिक ननावरे सरपंच, सुरेखा घाटे उपसरपंच, शंकर चौधरी माजी तंटामुक्त अध्यक्ष तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामवासी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवड समितीमध्ये रवी थुल, रमेश जांभूळे, गजानन नेताम, रमेश मत्ते ,दादाजी दोहतरे, ऋषी राजंहिरे ,संदीप नन्नावरे ,प्रकाश जांभुले आदि सर्व गावकरी उपस्थित होते.
श्री सचिन भाऊ डुडुरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सर्व सदस्य गण तसेच गावकऱ्यांनी कौतुक केले.







