महागाव नगरपंचायत प्रशासनाकडून नगरोत्थान योजनेतून सिमेंट रोड कामाचे भूमिपूजन संपन्न

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.23 ऑगस्ट) :- शहरातील जुने महागाव परिसरात प्रभाग क्र. 11 मधील हनुमान मंदिराच्या बाजूला नगरपंचायतच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत आशा बावणे नगरसेविका यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामांचा भूमिपूजन सोहळा 23 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. मागील दोन वर्षापासून या प्रभागातील रस्त्याचे काम प्रलंबित होते. होऊ घातलेल्या विविध रस्ते विकास कामामुळे प्रभागातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. 

   शनिवारी महागाव नगरीतील प्रतिष्ठित व्यक्ती भगवानराव नरवाडे पाटील आणि हनुमान देवस्थान मध्ये दैनंदिन आरती कार्यक्रमाचे प्रमुख दिगंबरराव गाडबैले आणि इतर सदस्य गण यांच्या हस्ते सकाळी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. या सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी महागाव शहरातील ज्येष्ठनेते नगरसेवक संभाजीराव नरवाडे, महागाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सुनंदाताई कोपरकर,उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, नगरसेविका आशाताई बावणे , नगरसेवक सुजित ठाकूर, माजी नगराध्यक्ष करुणाताई शिरबिरे , नगरसेविका सुरेखा कोपरकर , नगरसेविका सुनीता डाखोरे , नगरसेवक विशाल पांडे,नगरसेवक महेश पाटील,महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका रूपाली कोल्हेकर, नगरसेविका जयश्री इंगोले, नगरसेविका जयश्री नरवाडे, काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा शहराध्यक्ष शैलेश कोपरकर, शिवाजीराव डाखोरे यांचे सह महागाव शहराचे मानकरी नितीन विजय नरवाडे, नित्यानंद नंदकुमार नरवाडे, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नेते महेंद्र कावळे, अमर नरवाडे, सुरेश गणपत नरवाडे तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत सदर भूमिपूजन सोहळा 23 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता हनुमान मंदिर संस्थानची सकाळच्या आरती उत्सव पार पडल्या नंतर या सिमेंट काँक्रेट रोडचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.