झालेल्या अतिवृष्टीत वडद येथील शेतकऱ्यांचे सोलर पंपाचे मोठे नुकसान

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव (दि.23 ऑगस्ट) :- मागील आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या मध्ये वडद (मुडाना) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. झालेल्या अतिवृष्टी मध्ये सुसाटच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी विद्युत जमिनीवर लोमकळले. वादळामध्ये शेतकऱ्यांचे शेती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे द्वारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

    16 आणि 17 ऑगस्ट रोजी आठ दिवसापूर्वी झालेल्या नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना सावरणे कठीण झाले. तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नदीच्या आणि नाल्याच्या पुराने पार खरडून गेल्या आहेत. शेत पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या अतिवृष्टीच्या वादळात तालुक्यातील वडद (मु.) येथील शेतकरी उकंडराव किसन वानखेडे यांच्या शेतातील सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उकंडराव वानखेडे यांच्या वडद (मुडाना) शेतशिवारातील गट नंबर 242 सोलर पंपाचे 16, 17 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसात वादळी वाऱ्याच्या तराख्यात शेतातील लाखो रुपयांच्या सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाले.

शेतालगत असलेल्या मोठ्या नाल्याला प्रचंड प्रमाणात पूर येऊन पुराचे पाणी शेतात शिरले होते. उकंडराव वानखेडे यांच्या शेतातील पिकांसह सोलरपंम्प 5 हाऊस पॉवरची चालू असलेल्या इकोझेन कंपनी सोलर पम्पांच्या मोठा प्रमाणात प्लेट्सचे व इतर शेती उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. शेतकरी वर्गातून झालेल्या नुकसानीच्या तात्काळ पंचनामा होऊन मदत मिळावी अशी मागणी होत आहे.