🔹पाच कामगाराचे अमरण उपोषण वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक अध्यक्षजेटमलजी माहेश्वरी यांचे नातू अजय माहेश्वरी यांनीशेतकऱ्याचे हित जोपासून उपोषण स्थळी दिली भेट
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव (दि.13 ऑगस्ट) :- तालुक्यात वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी येथील सेवानिवृत १८१कामगाराचे थकीत रक्कम ४ कोटी ७६ लाख असून ही रक्कम देण्यास कारखान्याचे अवसायक टाळाटाळ करित आहे १८१ सेवानिवृत्त झालेल्या कामगांराच्या ग्रॅच्युईटी च्या रक्कमेचे वाटप कामगार न्यायालय यांनी २०१४ व २०१७ मध्ये निकाल दिला होता.
दि २१ जुलै २०२१ मध्ये सेवानिवृत कामगारांच्या ग्रॅच्युईटी रक्कम अदा करण्या संबंधी कारखान्याचे अवसायक व युनियन यांच्या मध्ये उभयपक्षी करार झालेला असुन उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर यांनी ३० ऑगस्ट २०२२ रोजी १८१ सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युईटी रक्कम कारखान्यातील भंगार माल व स्टोअर मालाची विक्री करून अदा करण्याचे आदेश दिले ‘तरी आदेशानुसार कलम ७ ( G) नुसार कामगारांचे ४ कोटी ७६ लाख रुपये व्याजासह कामगारांना रक्कम अदा करा तिन वर्षा पासून कामगारांची ग्रॅच्युईटी रक्कम अद्याप मिळालेली नसुन अवसायक यांच्या कार्यालयाकडून भंगार मालाची विक्री करण्यात आलेली होती .
पण १८१ सेवानिवृत कामगारांना रक्कम वाटप करण्यात आलेली नसल्याने कामगारांत तिव्र संताप आक्रोश पसरला असुन कारखान्याने अवसायक केशव मस्के व सहायक अवसायक अरुन भालेकर हे जानुबजून टाळाटाळ करित असल्याने त्यांची तात्काळ बदली करावी व नवीन अवसायक नियुक्ती करावी सहायक अवसायक अरुन भालेकर यांना कामावरून बंडतर्फ करावे १८१ सेवानिवृत कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅच्युईटी रक्कम कामगार न्यायालय व उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर यांचे आदेश असताना अवसायक रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने कामगार अमरण उपोषणास उपविभागीय कार्याल्यासमोर पाच कामगार बसले एम.बी खंदारे ‘ व्ही .एस खडसे , आर .आर दोडके, बी पी मुनेश्वर आर सी जाधव हे कामगार अमरण उपोषणास बसलेअसून सर्वसामान्य जनतेत त्यांची मागणी रास्त असल्याचे बोलल्या जात आहे.तरी वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन रास्त मागणी निकाली काढावी ही मागणी जोर धरीत आहे.







