🔹बँकेतील लिपीक आणि त्याचा सहकारी अडकला बिटरगाव पोलिसांच्या जाळ्यात
🔸पंधरा दिवसांपूर्वी घडली घटना, झालेल्या लेखा परीक्षण अहवालातून झाली पोलखोल
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव (दि.5 ऑगस्ट) :- ढाणकी येथील जवळपास 19 ग्राहकाचे अंदाजे 30 ग्राम सोने बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. संबंधित विभागाच्या लिपिकानेच या सोन्यावर डल्ला मारत सोनाराकडे विक्री करण्यासाठी गेला असता त्याचे पितळ उघडे पडले. त्यामुळे बँकेच्या ग्राहकाने बँक परिसरात आपले सोने सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.
आपल्या एका सहकार्या सह बुलढाणा मल्टी को-ऑपरेटिव्ह ढाणकी शाखेच्या लिपिकाने एकंदरीत एकोणीस ग्राहकांची सुरक्षित ठेवण्यात आलेले बँकेतील सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत बँक व्यवस्थापनाला 3 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या तपासणी अहवाला वरून बँकेतीलच कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या सुरक्षा ठेव म्हणून ठेवलेले सोने लंपास केल्याने त्याच्यासह दुसऱ्या एका विरोधात पोलिसात तक्रार झाल्याने गुन्हे नोंद करण्यात आले. तब्बल अठरा दिवसानंतर तपासणी अहवाला वरून हा घोटाळा उघडकीस आला. त्यामुळे बँक ठेवीदारांत एकच खळबळ उडाली आहे.
उमरखेड तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी, बुलढाणा बँकेतील लिपिक उमेश सुनील वाघ आणि त्याचा सहकारी रामेश्वर गजानन धुमाळे दोघेही रा. बेलखेड तालुका उमरखेड येथील रहिवासी आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या लिपिकानेच बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणा र.नं. 267 मल्टिस्टेट ढाणकी शाखेत सोने तारण कर्ज विभागातील 30 तोळे सोने ज्याची अंदाजे बाजार मूल्य सत्तावन लाख रुपये बँकेच्या कपाटा मधून लंपास केले आहे.
सोने अपहार झाल्याची घटना 15 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान घडली. बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक मुग्धा विवेक देशपांडे, यवतमाळ यांनी बिटरगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. या वरून उमेश सुनील वाघ आणि रामेश्वर गजानन धुमाळे दोघा आरोपी विरुद्ध बिटरगाव पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. व कलम 316 ( 5)’318 (3),318 (4), 319 ( 2) 3 (5) भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हे नोंद झाले आहेत.
सदर अपहार प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चित्ता, अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर अन्नमवार हे करीत आहेत.







