पैनगंगा नदी पात्रात हिंगणी पेंडावर महसूल पथकाद्वारे रेती कार्यवाही

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी) 

महागाव (दि.4 ऑगस्ट) :- तालुक्यात मागील अनेक वर्षापासून रेती घाटाची हर्रास झाली नसल्यामुळे रेती माफीयांना रेतीघाट आयतेच कुरण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शिरपूर फुलसांगवी धनोडा या रेती घाटावर रेती चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. हिंगणी येथे रेती चोरटी वाहतूक चालू असल्याचा महसूल पथकाला सुगावा लागल्याने सोमवारी अकरा वाजता च्या दरम्यान पथकाने एका रेती ट्रॅक्टर चोरटी वाहतूक करतांना पकडून महागाव तहसील कार्यालयामध्ये जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली.

   सदरची कार्यवाही सखाराम मुळे उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली अभय मस्के तहसीलदार महागाव यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी महागाव फुलसावंगी राम पंडित, महसुल सहाय्यक दिपक चव्हाण, ग्राम महसुल अधिकारी विनोद ढोणे, महसुल सेवक विजय पोटे, केशव मोहिते, नितीन देवसरकर व पोलीस कर्मचारी जमादार गजानन एडतकर, गजानन खरात, चालक विशाल पिंगाणे यांचे सहकार्याने मौजा हिंगणी येथुन अवैधरीत्या रेती चोरून नेणारे वाहन पकडुन पुढील दंडात्मक कार्यवाही करीता तहसील कार्यालय महागाव येथे लावण्यात आले. सदर कार्यवाही ही कार्यवाही सोमवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात आली. सदर वाहन तानाजी दत्ता गरड रा. हिंगणी यांच्या मालकीचे आहे.