जल नगर वार्डातील नाल्यांची सफाई व रस्त्याच्या दुरवस्थेबाबत महानगरपालिकेला निवेदन

✒️ संजय तिवारी चंद्रपूर(Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.1 जुलै) :- 

दिनांक 30 जून 2025 रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने जल नगर वॉर्डातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेता महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले.

जल नगर वॉर्डातील नाल्यांची व रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या भागातील नागरिक अनेक दिवसांपासून डास, दुर्गंधी व दूषित पाण्यामुळे त्रस्त आहेत. सार्वजनिक आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने जल नगर वॉर्डातील नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेला निवेदन देत तात्काळ नाल्यांची सफाई व रस्त्यांचे दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.