🔹 ₹२६ हजार ६०० चा गुटखा जप्त
🔸महागांवात अनेक दिवसांनंतर अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही ; सद्दाम शेख यांच्या घरावर छापा
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.17 जून) :-
महागांव शहरात अनेक दिवसांनंतर अन्न व औषध प्रशासन (एफ.डी.ए.) विभागाने धडक कार्यवाही करत प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे. शहरातील सद्दाम शेख यांच्या राहत्या घरावर मंगळवारी टाकलेल्या छाप्यात तब्बल ₹२६ हजार ६०० किंमतीचा गुटखा आढळून आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, महागांव परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती एफ.डी.ए. पथकाला मिळाली होती. त्या नुसार पथकाने गोपनीय तपास करून सद्दाम शेख यांच्या घरावर छापा 16 जून रोजी छापा टाकला. या वेळी विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. पथकाने पंचनामा करून ₹२६ हजार ६०० किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. संबंधितां विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्या नुसार पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून महागांव शहरात अवैध गुटखा तस्करा विरोधात कार्यवाही झाली नव्हती. झालेल्या या कार्यवाही मुळे महागांवात अवैध गुटखा विक्री पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यवाही मुळे अवैध गुटखा विक्रीस प्रतिबंध होणार असून जन आरोग्याच्या दृष्टीने सातत्याने कार्यवाही व्हाव्यात असा नागरिकांतून सूर उमटत आहे. एफ.डी.ए.च्या या कार्यवाही मुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाने यापुढेही अशीच कठोर भूमिका कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणातील पुढील प्रशासकीय कायदेशीर कारवाईची चालू आहे.







