🔹वडिलांची लष्करी सेवेची परंपरा नेली पुढे
✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती(दि.18 जून) :- कु. श्रेया बर्डे,कन्या श्री. सतीश एन. बर्डे (सध्या भारतीय सैन्यात सुबेदार पदावर कार्यरत) हिची भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर पदासाठी AFCAT परीक्षेतून यशस्वी निवड झाली आहे.
श्रेया ही इंदिरा गांधी वॉर्ड हिंगणघाट जि. वर्धा येथील रहिवासी असून, तिच्या वडिलांच्या सैनिकी परंपरेपासून प्रेरणा घेत तिने देशसेवेसाठी आपली निष्ठा दाखवली आहे. तिने NCC (एअर विंग) मधून ‘C’ प्रमाणपत्र मिळवले असून,लेखी परीक्षेसाठी कोणतीही खासगी कोचिंग न घेता केवळ स्वअभ्यासाच्या जोरावर AFCAT सारखी कठीण स्पर्धा यशस्वीरीत्या पार केली आहे.
श्रेया सध्या डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. तिला महाविद्यालयातील कॅम्पस प्लेसमेंटद्वारे एका प्रसिद्ध MNC कंपनीत उत्कृष्ट पॅकेजसह नोकरीही मिळालेली आहे. सध्या तिचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले आहे.श्रेया ने आपल्या यशाचे श्रेय आई वडील आणि लहान बहीण मिस्टी ला दिले तसेच या यशाबद्दल श्रेया चे सर्वत्र कौतुक होत आहे.







