🔹 नागापूर (रूपाळा) येथील शस्त्रधारी युवकास केले जेरबंद
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.17 जून) :-
16 जुन रोजी दुपारी उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे तसेच डीबी पथक हे जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध चालू असलेल्या कार्यवाही मोहीमे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदारा कडून एक युवक तलवार बाळगून असल्याची माहिती मिळाली. तलवार बाळगणाऱ्या युवकाचे नाव सुशांत चाफेकर नागापुर(रूपाळा) येथील रहिवासी असल्याचे समजते.
या वरून उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांना माहिती देऊन त्यांचे आदेशा प्रमाणे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डीबी स्कॉट यांनी पंचसह रवाना होऊन नागापूर (रूपाळा) येथे पावणेदोन वाजताच्या दरम्यान सापळा रचून कार्यवाही केली. सुशांत किशोर चाफेकर वय 19 वर्षे रा. नागापूर (रूपाळा) ता. उमरखेड जिल्हा यवतमाळ यास ताब्यात घेऊन त्याच्या कडून मिळालेल्या माहिती प्रमाणे तलवारी बाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे कडील तलवार असल्याचे कबूल करीत सदर तलवार घराशेजारील झुडपात लपवून ठेवली असल्याचे बोट करून इशारा करीत दाखविल्याने सोबतच्या पंचा समक्ष त्याने तलवार स्वतःच बाहेर काढून दाखविली, ती पंचनामा करून जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 30 इंच लांबीची धारदार लोखंडी तलवार किंमत पाचशे रुपये किंमतीची जप्त करण्यात आली असून त्या बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, हनुमंत गायकवाड विभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, डी बी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे,पोलीस हवालदार चंदन जाधव, पोलीस शिपाई दिगंबर गीते, पोलीस शिपाई संघशील टेंबरे सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांच्या पथकाने यशस्वीरीत्या कार्यवाही पार पाडली.







