✒️भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती (दि.16 एप्रिल) :- अहेतेशाम अली जनसंपर्क कार्यालय भद्रावती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीचे स्वागत अहेतेशाम अली मित्र परीवारातर्फे करण्यात आले. या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मिरवणुकीत सहभागी बांधवांना शरबत आणी शीतपेय वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचारांचा प्रकाश मार्गदर्शक आहे.
त्यांच्या दूरदृष्टीतून घडवलेले संविधान हे समतेचा आणि सामाजिक न्यायाचा मंत्र आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत आहे. यावेळी न. प. वरोराचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, शाहीद अली, धर्मेंद्र हवेलीकर, आदेश बावणे, सरफराज अली, वसीम शेख, कादर शेख, शाहेबाज शेख, महिंद्रा माणूसमारे, प्रीतीताई गाणवीर, आशिष दुपारे, मुस्ताक भाई, सुनील बिंजवे, लक्ष्मण नेहारे, रमेश मत्ते उपस्थित होते.







