बापरे….दिड महिन्या नंतर बेपत्ता चिमुल्याचा लागला शोध

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.19 फेब्रुवारी) :- सावली पोलीस स्टेशन हद्दीतील सोनापूर येथील शिवण्या वय ८ वर्ष व यशिका वय ५ वर्ष या चिमुकल्या मुली वडिलासह ३१ डिसेंबर २०२४ पासून बेपत्ता झाले होते . याबाबतची तक्रार सावली पोलीस स्टेशन व बाल संरक्षण विभागाला देण्यात आली होती . शोध कार्य सुरु असतांना बारामती पुणे पोलिसांना दि. १२ फरवरी रोजी येथिल रेल्वे स्टेशन येथे मुली आढळल्या . त्यांना बाल सुदार गृहात ठेवण्यात आले आणि बाल संरक्षण विभागाच्या माध्यमातून दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन आईच्या स्वाधीन केले. 

तालुक्यातील सोनापूर येथील मंगेश भांडेकर हा आपल्या चिमुकल्या मुली शिवण्या व यशीका यांना घेऊन ३१डिसेंबर २०२४ रोजी फरार झाला. मंगेश हा नेहमी दारूच्या नशेत राहत असल्याने कुटुंबियांची चिंता वाढली होती . मंगेश दारूच्या नशेत पत्नी, आई, वडील यांना अनेकदा मारहाण करीत असे. त्यामुळे मागील एक वर्षांपासून पत्नी आशा मंगेश भांडेकर ही चामोर्शी तालुक्यातील दोटकुली येथे मुलींसह माहेरी राहत होती. मात्र मोठ्या मुलीची शाळा असल्याने ती आजी आजोबाकडे सोनापूर येथे राहत होती. आई रोवणीच्या कामाला तेलंगणा येथे गेली असता लहान मुलीला घेऊन आला व ३१ डिसेंबरला दोन्ही मुलींना घेऊन बेपत्ता झाला.

सदर प्रकाराबाबत आजी आजोबा यांनी सावली पोलीस स्टेशनला व आई आशा मंगेश भांडेकर हिने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालयात तक्रार दिली. बाल संरक्षण विभागातही ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. सावली पोलीस स्टेशनचे हवालदार संजय शुक्ला यांचेकडे तपास होता तर सोबतीला चंद्रशेखर गम्पलवार,सतीश वाघमारे हे पोलीस शिपाई होते त्यांनी मिसिंग तक्रार दाखल केली व शोध सुरु केला. चंद्रपूर बाल संरक्षण विभागाचे प्रमुख अजय साखरकर यांनीही प्रयत्न सुरु केले.

दोन चिमुकल्या आणि वडील पुणे येथे असल्याची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने पुणे येथे जान्याचे ठरविले . व पुणे गाठले . या प्रकरणाची सर्व माहिती पूणे व बारामती पोलिसांना देण्यात आली होती . त्यामुळे तेथील पोलिस विभागाने त्यावर नजर ठेवून शोधमोहीम सुरू केली असता त्यांना आणि सावली पोलिसांच्या मदतीने पतीशी संपर्क साधला असता पतीने तू नको येऊ अन्यता मि बारामतिला निघुन जाईन अशी धमकी दिली आणि पुणे येथून बारामती ला जान्याच्या बेताने दोन मुली आनी स्वता पुणे रेल्वे स्टेशन जवळ मुलीना घेऊन गेला , आणि त्याना पुणे रेल्वे स्टेशन जवळ ठेऊन बेपत्ता झाला .

त्याच वेळी पुणे , बारामती पोलिसांनी रेल्वे स्टेशन गाठून त्या दोन चिमुकल्याणा ताब्यात घेऊन बाल सुधार गृहात ठेवले . बारामती पोलीस व पुणे बाल संरक्षण विभाग यांनी मुली ताब्यात घेऊन पुणे येथे पोलीस शिपाई सतीश वाघमारे यांचे समक्ष आई आशा भांडेकर व नातेवाईकाच्या ताब्यात दिले.अखेर प्रशासनाच्या शोधकार्याला यश आले .