✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.19 फेब्रुवारी) :- मधमाशाच्या हल्यात दोन वन कर्मचारी जख्मी झाल्याची घटना मंगळवार रोजी १२-३० वाजताच्या सुमारास घडली असून वनरक्षक आणि वनमजूर आशा दोन वनकर्मचारी यांचा समावेश आहे.
दिवाकर लहानुजी गुरनुले ५२ वर्ष ( वनरक्षक ) मिथुन अंबादास पेंदम ३० वर्ष (वनमजूर ) रा. पेंढरी असे जख्मी झालेल्या वनकर्मचारी यांचे नाव असून त्यांचेवर सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे सध्या ख़रीपासह रब्बी पिकांचाही हंगामा संपन्याच्या मार्गावर आहे तालुक्यात काही प्रमानात धानाचे डब्बल फसल सुरु असल्याने उर्वरित सारे क्षेत्र पिकाविना निर्जन आणि ओस असल्याचे दिसुन येत आहे .
तालुक्यातील पाथरी,पेंढरी व्याहाड,राजोली हे उपक्षेत्र अति संवेदन शील असून जंगलव्यात असल्याने या उपक्षेत्रात वन्यजीवांचे दर्शन,हल्ले दिसुन येतात वृक्षाच्या पानाची गळती सुरु असलेली पानझळी जनु वसंत ऋतुचे संकेत देत आहे त्यामुळे वनाचे सवरक्ष न आणि संगोपन आदि कामासाठी वनकर्मचारी याना आपापल्या क्षेत्रात भटकावे लागते घटनेच्या दिवशी सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र पेंढरी येथील वनरक्षक दिवाकर गुरनुले आनी वनमजूर मिथुन पेंदाम वनाची गस्त करीत होते .
दरम्यान चकमांनकापुर येथून पेंढरी कड़े येत असताना नजिकच्या वृक्षावर बसलेल्या मदमाशाच्या एका थव्याने दोन्ही वनकर्मचारी यांचेवर हल्ला चढ़विला जंगलात सर्वत्र निर्जन आणि खुले वातावरण असल्याने मदमाशाच्या हल्ल्यातुन सुटका करने कठिन होऊन बसले परिनामी मोठ्या हिमतीने दोन्ही वनकर्मचारी पेंढरी मुख्यालया पर्यंत पोहचले लागलीच त्याना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करन्यात आले जंगलव्याप्त भागात अनेक ठिकानी मदमशाचे वास्तव्य असल्याने जीव मुठित ठेऊन जंगलात गस्त करण्याची वेळ निर्माण झाली आहे
एकीकड़े वन हिंस्र पशुचि दहशत तर दुसरीकडे मदमाशानचा हल्ला आदि कारणास्त्व वनाचे सवरक्षंन आनी संगोपन करताना वन कर्मचारी याना तारेवर्ची कसरत करावी लागत आहे मदमाशाच्या हल्ल्यात जख्मी दोन्ही वनकर्मचारी सुखरूप असल्याचे पेंढरी मक़्ता उपवनक्षेत्रा कडून सांगितले जात आहे .







