मुलाचे लग्न आटोपून घराकडे जाताना आईचा अपघातात मृत्यू

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 चंद्रपूर.(दि.4 मे) :- आपल्या मुलाचा विवाह सोहळा आटोपून समोर घरी जाऊन सुनेच्या स्वागतासाठी जावे लागेल या दृष्टिकोनातून आपल्या पुतण्याचा दुचाकी गाडीवर येणाऱ्या नवरदेवाच्या आईचा अपघातात मृत्यू झाल्याची घटनेने संपूर्ण सावली शहरात शोककडा पसरली आहे.

 सावली येथील नगर पंचायत चे कर्मचारी अविनाश राऊत यांचा विवाह गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील निमगाव या गावी होता.दुपारी 3 च्या सुमारास लग्न आटोपल्यावर सायंकाळी 5 च्या सुमारास नवरदेव अविनाश ची आई सौ. रेखा नामदेव राऊत वय 50 वर्ष ही आपल्या पुतण्या बंडू सोबत दुचाकी वाहनाणे सावली कडे यायला निघाली. गडचिरोली शहरातील कारगिल चौक परिसरात पिकअप चार चाकी वाहनाला ट्रकटर ची ट्राली ही टोचन बांधून नेत असतांना पिकअप वाहनाचा हलगर्जी पनामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी ला धडक बसली त्यात बंडू व रेखा हे दोघे ही खाली कोसळले मात्र रेखा च्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले मात्र रेखा ला मृत्यू घोषित केले.

इकडे नवरी मुलीला घेऊन येणाऱ्या नवरदेव मुलगा अविनाश ला अपघाताची माहिती मिळाली आणि तो थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचला. आणि आई चा मृतदेह दिसताच एकच हंबरडा फोडला आणि संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. या अपघाताची माहिती सावली शहरात पोहचताच अनेक जण दुःख व्यक्त केले व अविनाश च्या घराकडे धाव घेतली.

नामदेव राऊत यांच्या दोन्ही मुलांचे लग्न पार पडले एक दिवस अगोदरच मोठ्या मुलगा अमित चा सावली येथे विवाह पार पडला आणि दुसरा अविनाश चा ला बाहेर गावी होता आणि असा अचानक दुःखद घटना घडल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.