माजरी येथील  शिवशक्ती  दांडिया उत्सवाला उदंड प्रतिसाद 

🔹शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.22 ऑक्टोबर) :- तालुक्यातील माजरी कॉलरी  येथील शिव – पार्वतीश्वर मंदिर , सबएरिया कार्यालयासमोर  दि. २१ ते २३ऑक्टोंबर या कालावधीत  स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने  महिला – भगिनिंसाठी शिवशक्ती  दांडिया उत्सव आयोजित करण्यात आला. या उत्सवाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.  

      काल दि. २१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी   शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते  माता संतोषी मातेचे पुजन करून  या उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी माजरी ग्रा.पं. सरपंच छाया जंगम,स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टच्या विश्वस्त  सुषमा शिंदे, उत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष रविशंकर रॉय व कार्याध्यक्ष रवि भोगे, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भद्रावती  तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुका प्रमुख  दत्ता  बोरेकर, तालुका सघंटिका अश्लेषा  जिवतोडे (भोयर).

भद्रावती शहर समन्वयक  भावना  खोब्रागडे, माजरी शहर सघंटिका गायत्री यमलावार,प्रमोद ढगे, सुबोध तिवारी,गोला कुमकिया, वीण बहादे, मधु सिंग, उषा परमार, वनिता मानुसमारे, दिपीका मानुसमारे, कांक्षीनी निशाने, सुनीता गौतम प्रसाद, बेबी चांदेकर, वैशाली पिंपळकर, रुचिता ढगे आणि  अश्विनी कोहळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

परंपरागत उत्सवातून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडावे : रविंद्र शिंदे

भारत देश विविधतेने नटला आहे. आपल्या देशात विविध परंपरागत उत्सव साजरे केल्या जातात. या   उत्सवातून बंधू -भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळत असते. प्रत्येकांनी आपआपले परंपरांगत उत्सव साजरे करतांना परस्परांचा आदर सन्मान कायम ठेवून या उत्सवातून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडावे. असे आवाहन रविंद्र शिंदे यांनी केले.