खांबाडा येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.25 फेब्रुवारी) : – राजकीय पाठबळाची जोरावर रेतीतस्करीत राजेशाही गाजवणाऱ्या खांबाडा येथील एका भाजप कार्यकर्त्याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळ्या आहे. अवैध रित्या रेतीची वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करत 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील खांबाडा येथील पोत्रा नदिघाटातून गेल्या काही महिन्यांपासून अवैध रेती तस्करी केल्या जात होती. या रेती तस्करी मध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याचा समावेश होता. राजकीय पाठबळाच्या जोरावर गावकऱ्यांना धमक्या व मारहाण करून प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन त्याचा हा गोरखधंदा सुरू होता.

रेती तस्करीत राजश्रय गाजवणाऱ्या येथील तस्करांनी शासनाचा करोडो रुपयाचा महसूल स्वतःच्या घशात घातला. मात्र तरी सुद्धा महसूल प्रशासन आंधळ्याचे सोंग घेऊन गप्प होते. पोलीस और महसूल प्रशासन मेरे जेब मे अशी या भाजप कार्यकर्त्याची वाणी तक्रार करता समोर चालायची. याबाबत कोणी तक्रार केल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी तसेच मारहाण करण्यात यायची.

मात्र नुकत्याच रुजू झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी नओमी साटम यांनी या मुजोर रेती तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहे. खांबडा येथील पोतरा नदी घाटातून अवैधरीत्या रीती तस्करी करताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 ए पी 1807 व विना नंबरची ट्रॉली व ट्रॅक्टर क्रमांक एम एच 32 ए एच 0422 वट्रॉली क्रमांक एम एच 40 ए 6340 या दोन ट्रॅक्टरवर अवैध रेती तस्करी करताना कार्यवाही केली आहे.

यामध्ये एकूण 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आकाश उईक बारवा, कपिल ढेकणे खांबडा आणि वसंता बावणे खांबडा या 3 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसून कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.मात्र अवैध मार्गाने कमावलेल्या पैशाची चौकशी करून आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी जन्सामान्यातून होत आहे.

त्यामुळे पोलिस प्रशासन थातुर मातुर कार्यवाही करून आरोपींना आश्रय देते की शासनाचा बुडालेला करोडो रुपयांचा महसूल जप्त करते हे बघणे औचीत्याचे ठरणार आहे. सदरची कार्यवाही पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी नाओमी साटम व पोलीस निरीक्षण अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव,पोलीस हवालदार दिलीप सुर, शशांक बदामवार, नितीन तुरारे, महेश गाऊत्रे यांनी पार पडली असून पोलीस तपास वरोरा पोलीस करत आहे.