उत्तम आरोग्य हीच खरी धन संपदा.सौ.वंदना बरडे

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.10 जानेवारी):- जिवक वाचनालय वरोरा येथे महिलांसाठी महीलाविषयक उपयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.दिनांक 7 जानेवारी 2023 ला रमाई बचत गट व जिवक वाचानालय यांच्या संयुक्त विद्यमाने माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचि सयूक्त जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले.

  प्रथम सावीत्रीबाई फुले ,माता जिजाऊ व माता रमाई,माहात्मा ज्योतीबा फूले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर सामाजिक कार्यकर्त्या यानी सावीत्रिबाई फूले, माता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिवन कार्यावर प्रकाश टाकला व आरोग्य विषयक मूलभूत आरोग्याच्या गरजा, आरोग्य कसे राखावे, काय काळजी घ्यावी,आहार कसा असावा, काय तपासण्या कराव्यात, आजारांची भयानकता, खानपान, ध्यानधारणा , इत्यादी वर प्रकाश टाकला आरोग्याची शपथ दिली आणि हसण्याचे महत्व समजावून सांगितले आणि हास्यकल्लोळने भाषणाचा शेवट केला.