चिमुकल्यांनी रस्त्यातील खड्डय़ात रांगोळी काढून केला जाहीर निषेध आंदोलन

31

🔸शेगाव ते शेगाव पाटी रस्त्याच्या मागणी साठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेनेतर्फे अभिनव आंदोलन

✒️ मनोज कसारे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि .22 फेब्रुवारी) :- तालुक्यातील शेगाव येथे रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणी साठी रांगोळी काढत अभिनव आंदोलन करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे व युवती जिल्हा प्रमुख तथा सरपंच प्रतिभा मांडवकर यांच्या नेतृत्वाखाली रांगोळी काढत आंदोलन करण्यात आले. चिमुकल्यांनी रांगोळी काढून या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला.

शेगाव ते चिकणी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे पडले असून साधी मोटरसायकल घेऊन जावू शकत नाही. लोकाना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. खराब रस्त्यामुळे विद्यार्थी याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यांची बससेवा बंद झाली आहे. अनेक अपघात या रस्त्याने घडत आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजणे अवघड झाले आहे. सतत निवेदन देवून देखील या प्रशासनाला जाग आली नाही.

या रस्त्यासाठी खड्ड्यात कागदी नाव सोडून आंदोलन केले पण लोकांच्या जिवाशी खेळ चालू आहे. गिट्टी बाहेर निघाली आहे संपूर्ण भागातील रस्त्याची हीच अवस्था आहे. अनेक निवेदन दिले आहे. तालुक्यातील 26 गावातील रस्त्यासाठी अभिजित कुडे यांनी निवेदन दिले आहे पण तरी 2 रस्त्याची काम झाली आहे बाकी रस्त्यासाठी त्यांचा संघर्ष अजून सुरू आहे. शेगाव रस्त्याची तात्काळ रस्त्या डांबरीकरण करावा अन्यथा मोठे आंदोलन बांधकाम विभागवार काढणार असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे.

गावातील रस्त्याच्या मागणी साठी चिमुकल्या मुलींना ,विद्यार्थिनी यांनी रांगोळी काढत आंदोलन केले यावेळी वैष्णवी मांडवकर, ऋषिका धानोरकर, श्वेता आत्राम, सुहानी किन्नाके ,प्रशांत मांडवकर, विशाल कोडापे ,नियती मांडवकर ,समीक्षा किन्नाके, लक्ष्मी माकडे ,रोशन भोयर, सुहास फोपारे, धर्मराज येलेकर, गणेश सालेकर, गोपाळ येलेकर, सदानंद चौधरी, उर्मिला चौधरी, वैभव पुसदेकर उपस्थित होते.