आनंद निकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयावर मार्गदर्शन Guidance for students of Anand niketan college on the topic of competitive examination 

🔸इंडस्ट्री इन्सपॅक्टर निरंजना भोयर याचे मार्गदर्शन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.19 एप्रिल) :- 

                नुकत्याच लागलेल्या एमपीएससी (इंडस्ट्री इन्स्पेक्टर ) या निकालात ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात पहिल्या आलेल्या निरंजना भोयर यांनी *आनंद निकेत महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत* आयोजित केलेल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांनी आपला जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

स्पर्धा परीक्षेतील आव्हाने व त्यांना कशाप्रकारे समोर जायचे यावर प्रकाश टाकत विविध प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे विविध पैलू समजावून सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पुसाटे तसेच आभार मयूर बुरांडे यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरविंद सवाने , समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रंजना लाड, प्रा. मुधोळकर, डॉ.निलेश उगेमुगे,प्रा. तिलक ढोबळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. हेमंत परचाके उपस्थित होते.