रामदेगी येथे धनधान्य महालक्ष्मी कृपा,यज्ञ व सत्संग सोहळा संम्पन्न

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.6 जानेवारी) :- रामदेगी तीर्थक्षेत्री येथे दिनांक 4/1/2024 ला परम श्रधेय हनुमान चरणरज श्री मंगेश महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून समाज प्रबोधन व सत्संग, ते म्हणाले समाजातील विसंगती आजचे मनुष्य जिवन आजचे संस्कार,रामजन्मभूमी, अशे अनेकानेक विषयावर चिंतन मनन व समाज प्रबोधन झाले, तसे सप्त कुंडीय यज्ञ् पूजन कार्यक्रम पौरोहित्य पंडित सतिश गुरुजी, नागपूर यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्र व तेलंगाणा येथील अनुयायी हजारोच्या संख्येत उपस्थित होते.

कार्यक्रममाला विषेश उपस्थित ह.भ.प.फलाहरी महाराज,ह.भ.प.जिवन महाराज,ह.भ.प.पंजाबराव आंबोरे महाराज,ह.भ.प.देवा महाराज, मारोती महाराज,गणपतराव डाये या दिव्यमूर्तीचा सत्कार शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमच्या यशस्वीते साठी चिंताहरण देवस्थान मु.खोकरी चंदनखेडा कपिश्र्वर चे अध्यक्ष श्री हनुमंतराव कारेकार,प्रकाश कंगालेगुरुजी,प्रभाकर बारेकर,दशरत ठावरी, रमेश भोयर, प्रदीप बदकी,हर्षल महाले,दिनेश सोनुने, गोविंदराव महाले,बाळकृष्ण तामखाने, सुधाकर भेदोडकर, गणेश भुजाडे,सुरेंद्र वांढरे,इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.