भद्रावती तालुक्यात “एच.आय.व्ही/एड्स बद्दल माहीती व जाग्रृती” अभियान संपन्न

🔸स्व. श्रीनिवास विकास मेमोरियल रविंद्र विकास चॅरीटेबल ट्रस्ट व ग्रामीण रूग्णालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने

✒️मनोज कसारे(वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा(दि.१५डिसेंबर):- १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधी मध्ये  “मातेकडून होणाऱ्या बाळाला एचव्ही / एड्स संसर्गापासून प्रतिबंध करणे” य बाबतचा संदेश घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहचविण्याचे कार्य सुरू आहे.

या अनुषंगाने भद्रावती संत विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज जन प्रोत्साहन व प्रबोधन कार्यक्रम अंतर्गत. श्रीनिवास शक्ति मेमोरियल रविंद्र विकास चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर व जागतिक एड्स दिनानिमित्य कार्यक्रम जनजागृति ग्रामीण रूग्णालय, भद्रावती यांच्या  संयुक्ते “एच.आय.व्ही./एड्स बद्दल माहिती व जाग्रृती” अंतर्गत भद्रावती गावातील गावकऱ्यांचा कार्यक्रम, पथनाट्य आले प्रबोधन व जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. एड्स जनजागृती कार्यक्रमाला संकल्प बहुउद्देशीय ग्रामीण संस्थापूर, महिला विकास आर्थिक महामंडळ तसेच वर्चस मल्टिपरस सोसायटी व जिजामाता कॉलेज कॉलेज भद्रावती येथील विद्यार्थिनींचे  सहकार्य लाभले.

जिजामाता नर्सिंग कॉलेज भद्रावती येथील विध्यार्धिनी शिवानी सोनटक्के, स्वेता काकडे, मानसीखल, स्वाती चोरकर, कोमल का, स्वेजल जाधव, स्नेहल तोंडसी, रागिनी गेडाम, स्नेहा भोयर, सुधा मडावी, स्नेहा पेटकर, श्रद्धा सोवले, प्रिया राम, आचल, मी कायु निकुरे, प्रिया राम, आचल , सुषमा नन्नवरे असे एकूण १७ अभ्यासाचे चमूने पथनाट्य द्वारे भाग घेतला

“एच.व्ही./एड्सबद्दल माहिती व जागृति” कार्यक्रमांत वायागाव( ‍दि. ६) जनजागृतीची कार्यक्रमात मदत करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र, चालबर्डी येथे दि.७ ला ३४ गावकऱ्यांची, दि. ८ ला परली येथील ३६ गावकऱ्यांचे, दि. ९ ला काटवलं (तू) येथील ३२ गावकरी, दि. १० ला मनगावांना थोर येथील ३६ गावकरी व हनुमान नगर भद्रावती येथील २५ गावकरी यांचा रक्त नमुने तपासण्यात आलेत. व पथनाट्यद्वारे जागृती करून मार्गदर्शन करण्यात आले.

सोबतच जागृती फेरी गावात काढण्यात आल्या.यावेळी प्रमुख उपस्थिती स्वरूपात ट्रस्टचे कार्याध्यक्ष धनंजय आस्वले, भद्रावती ग्रामरूग्णालय आरसीटी समोपदेशक शितल भडके, लॅब टेक्निशीएन डिम्पल चहारे, डीआरपी कार्यकर्ता रो आकुलवार, शालिनी दुर्योधन  आऊटरिच वर्कर ट्रूकर प्रवीण चिताडे, किरण सालवी यांनी उल्लेखनीय कार्य केले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी.स्व श्रीनिवास शिंदे  मेमोरियल रविंद्र चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर सदस्य पिरली येथील दत्तू येरगुडे, हेमराज नन्नवरे का (तू), भारत वांढरे मनगाव थोरांना तसेच ट्रस्टचे इतर सदस्य व गावकरी यांनी मेहनत घेतली.

या सर्व जनजागृती अभियानाला ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शिदे यांनी सस्थेचा माध्यमातून कार्यक्रमाकरिता पथनाट्य करण्याऱ्या मुलींच्या सुरक्षेचा दृष्टीकोन समोर ठेवून येण्या- जाण्याचा प्रवास, नाष्टा पाणी इ.ची संपूर्ण व्यवस्था करून सहकार्य केले. जिजामाता नर्सिंग कॉलेज भद्रावती येथील पथनाट्य द्वारे जनजागृती कार्यक्रमात सहकार्य करणारे विद्यार्थिनी चमूचा प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्याचे ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी बोलून दाखविले.