शेतकऱ्यांना दुष्काळ मदत नको तर सरसकट कर्ज माफी द्या शेतकरी नेते विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27 जानेवारी) :- राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करुन दोन महिने उलटले मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काही नाही.आर्थिक मदत जाहीर केली असून अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात काही पडले नाही.तर दुष्काळ जाहीर घोषणा वाऱ्यावर असल्याचे शेतकरी नेते विनोद उमरे यांनी म्हटले आहे.

राज्य शासनाचे प्रथम दुष्काळाची पाहणी करुन केले.दुष्काळाच्या अनुषंगाने उपायोजना केवळ कागदावरच राहिला.अतिवृष्टीचे पंचनामे झाले मात्र त्यांचीही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही.दुष्काळ,अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात शेतकरी राजा सापडला आहे.तर शेतकरी राजाला दुहेरी संकटातून बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्ज माफी द्या.

सतत नापिकीमुळे शेतकरी राजाला पिक कर्ज कसे काय भरावे असा प्रश्न ? शेतकरी राजा पुढे उपस्थित झाला आहे.अशा संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने सरसकट कर्ज माफी द्यावी .शेतकरी राजाला दुष्काळ,अतिवृष्टी अशा दुहेरी संकटांतून बाहेर ‌काढावे. अशी मागणी शेतकरी नेते तथा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.