ग्रामपंचायत कोलारा येथे राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण समाजकार्य श्रमसंस्कार विशेष शिबिर

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर.(दि.27 जानेवारी) :- 

दिनांक २४जानेवारी २०२४ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान ग्रामपंचायत कोलारा येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथील एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांचे शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन २५जानेवारी २०२४रोजी शिबिर उद्घाटन समारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य वडस्कर मॅडम उद्घाटक म्हणून माननीय दशरथजी कुडमेथे उप आयुक्त अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विभाग नागपूर विशेष अतिथी म्हणून माननीय किशोर घाडगे प्रमुख प्रमुख अतिथी सरपंच शोभा कोयचाडे मॅडम तसेच गावातील सदस्य उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर खंगार सर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन कोमल वंजारी यांनी केले.

तसेच शिबिराच्या माध्यमातून गावातील व्यक्तींना विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अशाच प्रकारे दिनांक २४ ते ३०जानेवारीयादरम्यान विविध मार्गदर्शकांची मार्गदर्शने तसेच शिवार फेरी स्वच्छता सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज कार्य करण्याचे कार्य आठवले समाजकार्य महाविद्यालय बऱ्याच वर्षापासून करीत असल्याचे दिसून येतो.