६ नोव्हेंबर रोजी विठ्ठल हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त चंदनखेडा येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.2 नोव्हेंबर) :- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा परिसरातील प्रसिद्ध युवा कार्यकर्ते ‌ परिवर्तनाची जाणीव असलेले विठ्ठलजी रामकृष्ण हनवते माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ६ नोव्हेंबर २०२३ सोमवार ला.सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत चंदनखेडा येथे आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रिडा मंडळ व विठ्ठलजी रामकृष्ण हनवते मित्र परिवार अमित नन्नावरे, मंगेश नन्नावरे, मनोहर हनवते, स्वप्निल कुळसंगे, मंगेश हनवते,राहुल चौधरी, शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, महेश केदार,रोशन मानकर, नंदकिशोर जांभुळे, गणेश हनवते, पुरुषोत्तम चौखे,कुणाल ढोक,भुपेश निमजे,सौरभ बगडे, राहुल दडमल, शंकर दडमल, राकेश सोनुले , संदिप चौधरी, प्रफुल्ल ठावरी, प्रज्वल बोढे,प्रविण भरडे, पंकज दडमल, दिनेश दोडके, अविनाश नन्नावरे, संतोष गायकवाड, स्वप्निल चौके, विजय खडसंग,अनिल हनवते, देवानंद दोडके,प्रणित हनवते, देविदास चौखे,दिलिप ठावरी,आशिष हनवते, यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

वाढदिवसानिमित्त दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सोमवार ला सकाळी ७ वाजता राजमाता माणिका पेणठाणा पुजन ,७.३० ला पेणठाणा परिसरात श्रमदानातून स्वच्छता, वृक्षारोपण करण्यात येईल, सकाळी ११ वा गुरुदेव सेवा मंडळ चंदनखेडा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक मनोहर शालिक हनवते अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल.

याप्रसंगी अध्यक्ष स्थानी नागोराव जी ठावरी गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष प्रमुख पाहुणे :- मारोती गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य ,नथुजी बोबडे, श्रीराम सोनुले, उत्तमराव झाडे, किशोर निखार, व मार्गदर्शक जगदिश देवगीरकर भारतीय पोस्ट अपघाती योजने विषय माहिती. आदि मान्यवर उपस्थित राहतील.

व सायंकाळी ७ वा आदिवासी सामुहिक नुत्य स्पर्धा घेण्यात येईल. या कार्यक्रमाला उद्घाटक रविंद्र श्रीनिवास शिंदे माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे स्वेताताई भोयर ,आषाताई नन्नावरे, ग्रामपंचायत सदस्या , योगिताताई बोढे, मनोहर हनवते,आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे. मार्गदर्शन उमेश घोडाम मद्यपान एक जिवन घेणारा घातकी आजार या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे.

सामुहिक नुत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक १००१ रु व रोख व सन्मानचिन्ह बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा यांच्या कडुन, दुत्तिय पारितोषिक ७०१ रु रोख व सन्मानचिन्ह प्रकृती गणेश हनवते यांच्या कडुन तर तृतीय पारितोषिक ४०१ रु रोख व सन्मानचिन्ह मनोहर हनवते महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष यांचे कडुन . ७.३० ला. आदिवासी सामुहिक नुत्य स्पर्धा. या कार्यक्रमाला बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट , शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा, प्राथमिक आरोग्य केंद्र महात्मा गांधी तंटामुक्त समिती, विरांगणा मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर (धा) बिरसा बचत गट कोकेवाडा (मा) गुरुदेव सेवा मंडळ , महिला बचत गट, व समस्त ग्रामवासी आणि विठ्ठल हनवते मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

समस्त रक्तदाते युवक मित्रांना जाहीर आवाहन आपले राष्ट्रीय व सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान करून देशसेवा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विठ्ठल रामकृष्ण हनवते यांनी केले आहे.