कुरखेडा तालुक्यात देशी, विदेशी दारूविक्रीला आशीर्वाद कुणाचा? गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे दारू कुठल्या जिल्ह्यामधून येते असा प्रश्न उपस्थित झाले आहे 

✒️संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर (दि.16 जुलै) :- 

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असलीतरी मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूसह मोहफुलाची दारू सर्रासपणे विकली जात आहे. या खुलेआम दारूविक्रीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कुरखेडा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूविक्री सुरू आहे. कुरखेडासह पुराडा, मालेवाडा परिसरात देशी-विदेशी, मोहफूल दारूविक्रीला उधाण आले आहे. या दारूविक्रीला कुणाचा आशीर्वाद ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक कुटुंब दारूच्या आहारी जाऊन कित्येक नागरिकांना विषारी दारू पिऊन जीवसुद्धा गमवावा लागला आहे.

कुरखेडा तालुक्यातील ग्रामीणभागातील अनेक गावामध्ये दारूची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येते. दारू पुरवठा करणाऱ्या गाड्या मध्यरात्री दररोज मोठ्या प्रमाणात भरधाव वेगात चालतात. एखाद्याने बोलले तर मुजोरी करण्याचे प्रयत्नसुद्धा करीत असतात. कुरखेडा तालुक्यात तर पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर दारूविक्री केली जाते. तरीसुद्धा पोलिस प्रशासन का जागे होत नाही? असा प्रश्न जनतेसमोर उभा आहे. देशी-विदेशी तसेच मोहफुलाची दारू खुलेआम मिळत असल्याने

कठोर कारवाईची मागणी

बरेचसे नागरिक दारूच्या आहारी गेल्याने अतिशौकीन रोडलासुद्धा पडून असतात. आठवडाभरापूर्वी दारूमुळे चारभट्टी येथील एक व्यक्तीने दुचाकीने झाडाला घडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी दारूच्या नशेत असलेला मौशी गावातील एक तरुण दुचाकीसह रस्त्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. उघड्यावर दारूची विक्री केली जात असूनही पोलिस प्रशासन डोळे बंद करून आहे की काय? असा तालुक्यातील जनतेकडून विचारला जात आहे. पोलिस विभागाने दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

कायदा शांतता व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. दारूमुळे सुजान नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दारूविक्रीला पाठबळ कुणाचे? असा सवाल नागरिक करीत आहेत.