रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकी स्वरास उडविले, एक ठार , दुसरा गंभीर जखमी A sand smuggling tractor blew up a two-wheeler. One killed, the other seriously injured

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.11 ऑगस्ट) :- रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या अज्ञात (नंबर नसलेला)ट्रॅक्टरने मोटर सायकल चालवणाऱ्या तीन इसमाचा अपघात केला. त्यात एकाचा मृत्यू झाला असून एकाचा डोळा निकामी झाला आहे शिवाय तिसऱ्या व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. मात्र हा तिसरा व्यक्ती कोण हे अध्याप स्पष्ट होऊ शकले नाही 

              ही घटना गुरुवारी दहा ऑगस्ट रोजी साडेसात वाजता दरम्यान बरडकीन्ही फाट्यावर घडली असून. जखमींना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र वृत्त लिहीपर्यंत अद्यापही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली नाही. 

ज्ञानेश्वर डेबोजी निखुरे(३६) राहणार बरडकिन्ही असे मृतक इसमाचे नाव आहे. तर दिलीप मारुती बनकर राहणार बरडकिन्ही वय (३८) वर्ष असे जखमी इसमाचे नाव आहे. तिसऱ्या व्यक्तीचे अद्याप नाव कळू शकले नाही.