गीरसावळी ते गीरसावळी पाटी रस्त्यासाठी तहसीलदारांना साकडे Sacade to Tehsildar for Girsawli to Girsawli Pati road

58

▫️तात्काळ रस्त्याचे काम करावे अन्यथा आक्रोश आंदोलन करू…अभिजित कुडे(Road work should be done immediately otherwise we will protest…Abhijit Kude)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28 जुलै) :- वरोरा तालुक्यातील गीरसावळी ते गीरसावळी पाटी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याचे प्रवास करणे देखील कठीण झाले आहे. लोकाना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याच्या मागणी साठी तहसीलदार, उपविभागीय बांधकाम अभियान यांना 3 निवेदन देवून देखील कोणतीच दखल घेतली गेली नाही.

सर्व सामान्य माणसाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे खड्डय़ात पाणी साचल्याने लोकाना अंदाज येत नसून अनेक अपघात घडत आहेत. अभिजीत कुडे गेल्या 2 वर्षापासून सतत या बाबत पाठपुरावा करत आहे.

या रस्त्याच्या डांबरीकरण करण्यात यावे या बाबत पाठपुरावा करावा असे साकडे तहसीलदार यांना घालण्यात आले. मात्र अजून पर्यंत. प्रशासनाने दखल घेतली नाही तर आक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

या रस्त्याची खूप बिकट अवस्था झाली आहे त्या संबंधी विधानसभा अध्यक्ष रविन्द्र शिंदे तालुका अध्यक्ष दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना अभिजित कुडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी निखिल मांडवकर,रीतीक सावरकर, आदित्य मडावी, तेजस उरकुडे उपस्थित होते.

https://smitdigitalmedia.com/